
येणारी आव्हाने परतवण्यासाठी आपण वज्रमुठ करूया, असे आवाहन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई - भारतीय प्रजासत्ताक दिन (republic day of india) आज देशभरात उत्साहाने साजरा होत आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हेसुद्धा उपस्थित होते. याशिवाय राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते. पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला राष्ट्रीय सलामीसह मानवंदना दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्या हस्ते शिवाजी पार्कवर (Shivaji Park) ध्वजारोहण करण्यात आले. शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवरसुद्धा उपस्थित राहिले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर पहिल्यांदाच बाहेर पडले असून तब्येतीच्या कारणास्तव खबरदारी म्हणून गाडी सावकाश आणण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे,तेजस ठाकरे तिघेही एकाच गाडीतून आले. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip walase-patil), महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यासह इतर मान्यवरही शिवाजी पार्कवर उपस्थित होते. .
असीम त्याग, समर्पण आणि अनेकांचे हौतात्म्य यातून साकारलेले भारतीय प्रजासत्ताक बलशाली करूया. येणारी आव्हाने परतवण्यासाठी आपण वज्रमुठ करूया, असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.