esakal | उद्धव ठाकरेंच्या नावावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एकमत?
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरेंच्या नावावर सहमती दर्शविली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक होत असून, या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. शिवसेना आमदारांची शुक्रवारी बैठक होणार आहे. यात सर्वकाही स्पष्ट होणार आहे.

उद्धव ठाकरेंच्या नावावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एकमत?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : राज्यात महाशिवआघाडीचे म्हणजेच शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार स्थापन होणार हे निश्चित होत असताना मुख्यमंत्री पदावर या तिन्ही पक्षांचे एकमत झाल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद देण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी सहमत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरेंच्या नावावर सहमती दर्शविली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक होत असून, या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. शिवसेना आमदारांची शुक्रवारी बैठक होणार आहे. यात सर्वकाही स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत आज अंतिम टप्प्यातील चर्चा होत आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यावर घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारावे अशी कॉँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही इच्छा आहे. शिवसेनेतही त्यांच्याच नावाची चर्चा आहे.

सरकार अस्तित्वात येण्याची चिन्हे; आज काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक 

शरद पवार यांनी सोमवारी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. मात्र, या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे पवार यांनी सांगितले होते. तसेच त्यानंतर मंगळवारीही संजय राऊत आणि पवार यांच्यात चर्चा झाली होती. आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी पाच दिवसांत सरकार येईल आणि उद्या चित्र स्पष्ट होईल, असे म्हटले आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचे गणित सोडविले गेल्याचे यावरून स्पष्ट होते.

संजय राऊतांना आज आठवली वाजपेयींची कविता; काय आहे पाहा...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख असून, शिवसेना नेत्यांकडून त्यांचे नाव पुढे आल्याने विरोध होण्याची सुतराम शक्यता नाही. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही ठाकरे घराण्यातून मुख्यमंत्री होत असल्याने आपला आक्षेप नोंदविणार नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे आता स्पष्ट आहे. 

उद्या दुपारपर्यंत चित्र स्पष्ट; पाच-सहा दिवसांत सरकार : संजय राऊत 

loading image