esakal | काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते संजय राऊतांच्या भेटीला
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते संजय राऊतांच्या भेटीला

संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ते लिलावती रुग्णालयात आहेत. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप नेते आशिष शेलार यांच्या प्रमुख नेत्यांनी आतापर्यंत भेट घेतलेली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते संजय राऊतांच्या भेटीला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्याच्या राजकारणात महाशिवआघाडीच्या दिशेन पाऊले पडत असताना आज (बुधवार) काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी लिलावती रुग्णालयात जात आहेत. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ते लिलावती रुग्णालयात आहेत. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप नेते आशिष शेलार यांच्या प्रमुख नेत्यांनी आतापर्यंत भेट घेतलेली आहे. आजही त्यांच्या भेटीसाठी नेते जात आहेत. आज सकाळी साडेअकरा वाजता काँग्रेसचे नेते संजय राऊत यांची भेट घेणार आहेत. 

चंद्रकांत दादांच्या शुभेच्छांमुळेच आम्ही आघाडीसोबत- उद्धव ठाकरे

काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण लिलावतीमध्ये जाणार आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकही त्यांना भेटले आहेत.

राज्यपालांनी आम्हाला भरपूर वेळ दिला- शरद पवार