राज्याला पहिल्यांदाच मिळाल्या महिला शालेय शिक्षणमंत्री

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जानेवारी 2020

काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची कन्या वर्षा गायकवाड या चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. प्राध्यापक म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केलेले आहे.

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडील खातेवाटप आज (रविवार) जाहीर झाले असून, राज्याला पहिल्यांदाच एका महिलेकडे शालेय शिक्षण मंत्रीपद देण्यात आले आहे. हे खाते मिळाल्यानंतर काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी आनंद व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची कन्या वर्षा गायकवाड या चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. प्राध्यापक म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा अनुभव त्यांच्याकडे पूर्वीपासूनच आहे. आता त्यांच्याकडे हे पद आल्याने महाराष्ट्राला पहिल्या महिला शालेय शिक्षणमंत्री मिळाल्या आहे. 

अजित पवारांना अर्थमंत्रीपद, तर वळसे पाटील आणि दत्ता भरणेंना 'ही' खाती

वर्षा गायकवाड म्हणाल्या, की खातेवाटपात शालेय शिक्षणमंत्रीपदासारखी मोठी जबाबदारी दिल्याने मी पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे आभार मानते. शालेय शिक्षण खाते मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. शिक्षण हा खूप महत्त्वाचा विभाग आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी काम करण्याची संधी आहे. विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी काम करायचे आहे. चांगले शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शिक्षण खात्यात वेगवेगळे प्रयोग करण्यात येतील.  

अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती
पुण्याच्या जावयाला मिळाली गृहमंत्रिपदाची जबाबदारी, पाहा कोण?
सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा झाला कृषीमंत्री! 
चाळीत लहानपण गेलेल्या आव्हाडांकडे गृहनिर्माण मंत्रीपद
खातेवाटपात राष्ट्रवादीचा वरचष्मा; 'या' महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress MLA Varsha Gaikwad gets education ministry in Maharashtra government