Nilwande Dam: विखे थोरात वादात अडकलेल्या धरणाचं ५३ वर्षांनी झालं उद्घाटन, ८ कोटींच्या प्रोजेक्टला लागले ५,१७७ कोटीं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे.
Akole Nilwande Dam
Akole Nilwande DamSakal

Akole Nilwande Dam: निळवंडे येथे आज कालव्‍यातून पाणी सोडण्‍याची चाचणी घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. ५३ वर्षांपूर्वी मंजूर झालेले महाराष्ट्रातील अहमदनगर येथील निळवंडे धरण बुधवारी उघडणार आहे.

१९७० मध्ये हा प्रकल्प महालादेवी या नावाने मंजूर झाला. १९९५ मध्ये हे धरण निळवंडे येथे स्थलांतरित करण्यात आले. मंजुरीच्या वेळी त्याची अंदाजे किंमत ७.९ कोटी रुपये होती. आता ते २०२३ मध्ये पूर्ण झाले असून, त्यावर ५१७७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

निळवंडे धरणाची क्षमता घटली:

अहमदनगरच्या अकोले तालुक्यात परवर नदीवर निळवंडे धरण बांधले आहे. त्याची क्षमता १९७० मध्ये ११ टीएमसी निश्चित करण्यात आली होती, जी आता ८.२० टीएमसीवर आली आहे.

नाशिकमधील सिन्नरचा काही भाग आणि अहमदनगरच्या ६ तालुक्यांतील पाणीटंचाई दूर करण्याची क्षमता या धरणात आहे. २०१४ मध्ये धरणाचे काम पूर्ण झाले होते, मात्र त्याला जोडलेल्या कालव्यांचे जाळे तयार करण्यास जास्त वेळ लागला.

Akole Nilwande Dam
Maharashtra Politics: आता पॅम्प्लेटचा आधार ! सत्तासंघर्षाच्या निकालाबद्दल जनजागृतीसाठी ठाकरे गटाचा आटापिटा ?

६८,००० हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल:

या धरणाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला एकूण १८२ किलोमीटर कालव्याचे जाळे तयार करण्यात आले आहे. यामध्ये डाव्या बाजूला ८५ किमीचा कालवा करण्यात आला आहे. तर उजव्या बाजूच्या ९७ किमी कालव्याचे काम अर्धेच पूर्ण झाले आहे.

त्यामुळे ६८ हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेमधील संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव आणि सिन्नर मधील सहा गावे असे एकूण १२५ गावांमधील पाणी प्रश्न मिटणार आहे.

Akole Nilwande Dam
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com