Nana Patole: काँग्रेसमध्येही वादाची ठिणगी; विजय वडेट्टीवारांच्या सल्ल्यावर नाना पटोले भडकले

काँग्रेसमध्ये आज विजय वडेट्टीवार विरुद्ध प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वाद
Nana Patole
Nana PatoleEsakal

महाविकास आघाडीतील धुसफूस आज सलग दुसऱ्या दिवशी कायम होती. काँग्रेसमध्ये आज विजय वडेट्टीवार विरुद्ध प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वादाचा आज दुसरा अंक पाहायला मिळाला. महाविकास आघाडीतील आमच्या नेत्यांनी जिभेवर संयम ठेवावा, असा सल्ला वडेट्टीवारांनी दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चांगलेच संतापले होते. (Latest Political News Marathi)

आम्ही वडेट्टीवारांचा बंद खोलीमध्ये निर्णय करू, ते एवढे मोठे नाहीत की त्यासाठी मी इथे उत्तर दिले पाहिजे, अशी आगपाखड पटोले यांनी माध्यमांशी बोलताना केली.राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी काँग्रेस-भाजप अशी युती झाली होती. चंद्रपुरात भाजप आणि काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढविली होती त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना पदावरून हटविले.(Latest Political News Marathi)

Nana Patole
Congress: काँग्रेस नेते सचिन पायलटांचं मुख्यमंत्री गेहलोत यांच्यावर टीकास्त्र; सोनिया नव्हे वसुंधरा राजे...

याबाबत बोलताना आमदार वडेट्टीवार म्हणाले, ‘‘ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका राजकीय पक्षांच्या चिन्हावर होत नाहीत. आपापसांत ताळमेळ करून त्या लढविल्या जातात. कारवाई करायची झाल्यास सर्वांवर कारवाई करावी लागेल. सहकार क्षेत्रांत कारवाई करत असताना ती विचार करून केली पाहिजे.’’

भाजपला फायदा होणार नाही

कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारात भाजप नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० पेक्षा जास्त सभा घेत रोड शो केले. एवढे करूनही त्यांना जमले नाही, अखेर त्यांनी बजरंग बलीचा आधार घेतला. मात्र, याचाही काहीच फायदा भाजपला होणार नाही, असे वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. विकासाच्या मुद्यावर भाजपला बहुमत मिळणार नाही म्हणून शेवटी बजरंगबलीचा आधार घेतला. कर्नाटकात ४० टक्के भ्रष्टाचार सुरू असल्याने जनता आता भाजपला मतदान करणार नाही. भाजप पराभूत होत असल्याने त्यांच्यावर ही वेळ आली आहे.(Latest Political News Marathi)

Nana Patole
Amol Kolhe: “भावी मुख्यमंत्री जयंत पाटील...”, म्हणणाऱ्या अमोल कोल्हेंनी केले अजित पवारांचं कौतुक

सर्वांवर कारवाई करणार का?

राज्यात अनेक ठिकाणी अभद्र युती झालेली आहे. त्यामुळे आता सर्वांवर कारवाई केली जाणार आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. साई रिसॉर्टप्रकरणी दिलासा मिळाला आहे. केवळ आरोप करून कोणाला फसविले जाऊ शकत नाही. राजकारणात सर्वांचीच घरे काचाची असतात हे लक्षात ठेवले पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले. महाविकास आघाडीला चांगले दिवस येणार आहेत. महाविकास आघाडी तोडण्याची भाषा करू नये, जोडण्याची भाषा करावी. लिहिताना, बोलताना संयम ठेवावा, असा सल्ला आमदार वडेट्टीवार यांनी संजय राऊत यांना दिला.(Latest Political News Marathi)

Nana Patole
Amit Shah: अमित शहांना सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का; या प्रकरणी दर्शवली नाराजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com