कोरोनाचा संसर्ग वाढतोय, मंत्रिमंडळ बैठकीत काय झाली चर्चा? जाणून घ्या

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली सविस्तर चर्चा
rajesh tope
rajesh toperajesh tope

मुंबई : राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा एकदा वाढायला लागल्याचं चित्र आहे. यापार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना माहिती दिली. यावेळी मास्कसक्तीबाबत सध्या कुठलाही निर्णय झाला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. (Corona infection is rising issue discussed in cabinet meeting Rajesh Tope gives info)

rajesh tope
देशांतर्गत दुभंगलेला भारत आता बाहेरुन कमकुवत झालाय - राहुल गांधी

काय म्हणाले आरोग्य मंत्री?

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, कोविडबाबत प्रत्येक मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरोग्य विभागामार्फत आपण संपूर्ण माहिती देतो. नेहमीप्रमाणं आजही याचं प्रेझेंटेशन झालं. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पॉझिटिव्हीटी वाढल्याचं सांगण्यात आलं आहे. यामुळं चाचण्यांची संख्या वाढवण्याच्या सूचना आज कडक पद्धतीनं देण्यात आल्या आहेत.

rajesh tope
नोटांवरील गांधीजींची प्रतिमा बदलण्याचा प्रस्ताव नाही - RBI

पॉझिटिव्हीटी रेट या सहा जिल्ह्यांमध्ये खूपच जास्त झाला आहे. ८ टक्के, ६ टक्के असा या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ही रेट आहे, ही या जिल्ह्यांपुरतीच सध्या वस्तुस्थिती आहे. पण यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १ टक्के रुग्णांना रुग्णालयांमध्ये अॅडमिट करावं लागत आहे. पण यामध्ये गंभीरतेचं प्रमाण कुठेही नाही. त्यामुळं तसा काळजीचा विषय आजिबात नाही, असंही टोपे म्हणाले.

rajesh tope
शाळा १५ जूनला होणार सुरु; मास्कसक्ती नाही - वर्षा गायकवाड

मास्कची सक्ती नसली तरी आवाहन केलं आहे की, त्याची अंमलबजावणी व्हावी. यासंदर्भात चर्चा झाली. तसेच आषाढी वारी संदर्भातही चर्चा झाली. वारीमध्ये दहा-पंधरा लाख लोक एकत्र येणार आहेत, असा परिस्थितीत काळजी घेऊन ही वारी पूर्ण करावी अशी प्रामुख्यानं चर्चा झाली आहे. वारीची तयारी पुढे गेलेली आहे. यामागे लोकांच्या भावना आहेत, त्यामुळं वारी होईल यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही, असंही यावेळी राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com