esakal | Corona Update : राज्यात 6,479 नव्या रुग्णांची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus

Corona Update : राज्यात 6,479 नव्या रुग्णांची नोंद

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : राज्यात आज दिवसभरात 6,479 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 63,10,194 झाली आहे. राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या काहीशी वाढून 78,962 इतकी झाली. आज 157 कोविड बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. (Corona Update 6479 new patients registered in maharashtra aau85)

हेही वाचा: दक्षिण मुंबईला कोरोनाचा विळखा, बाधितांच्या लसीकरणाची तपासणी

नागपूर मंडळात आज एकही मृत्यू झाला नाही. तर पुणे मंडळात आज सर्वाधिक मृत्यू झाले असून तिथे आज अनुक्रमे 46 मृत्यूची नोंद झाली. ठाणे 17, नाशिक 29, कोल्हापूर 38, औरंगाबाद 18, अकोला 2, लातूर 7 मृत्यू नोंदवले गेले. राज्यातील मृत्यूदर 2.1 टक्के इतका आहे. तर मृतांचा एकूण आकडा 1,32,791 वर पोहोचला आहे.

हेही वाचा: उपग्रहांमार्फत होणार ईशान्येकडील राज्यांची सीमानिश्चिती; केंद्राचा निर्णय

आज दिवसभरात 4,110 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 60,94,896 इतकी आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  96.59 टक्के एवढे झाले आहे.

हेही वाचा: सिंधूची मेडल जिंकल्यानंतर पहिली प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाली...

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,81,85,350 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,10,194 (13.1 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,67,986 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,117 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

loading image
go to top