राज्यात दिवसभरात ८,१२९ कोरोना बाधितांची नोंद

चोवीस तासात दुप्पट रुग्ण झाले बरे
Maharashtra Corona Update
Maharashtra Corona UpdateSakal Media

मुंबई : राज्यात दिवसभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट पहायला मिळाली. त्यानुसार, आज ८,१२९ रुग्ण आढळून आले. तर १४,७३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आता १,४७,३५४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे. (Corona update 8129 corona victims registered in the state during the day)

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात दिवसभरात ८,१२९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर २०० बाधितांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर गेल्या चोवीस तासात १४,७३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दरम्यान, राज्यात सध्या १,४७,३५४ अॅक्टिव्ह केसेस असून एकूण मृतांची संख्या १,१२,६९६ वर पोहोचली आहे. तर ५६,५४,००३ रुग्ण आजवर बरे झाले आहेत.

Maharashtra Corona Update
संपर्कात येताच कोरोनाचा नाश; पुण्यातील कंपनीचा भन्नाट मास्क!

दरम्यान, मुंबईत आज दिवसभरात ५२९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर ७२५ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच शहरात २९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. १५,५५० अॅक्टिव्ह रुग्ण सध्या शहरात आहेत. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com