esakal | COVID19 : राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 78 हजारापर्यंत खाली
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

COVID19 : राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 78 हजारापर्यंत खाली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात आज दिवसभरात 7,242 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 62,90,156 झाली आहे. राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन 78,562 इतकी आहे. तर आज 190 कोविड बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

हेही वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर मंडळात आज सर्वाधिक मृत्यू झाले असून तिथे आज 48 मृत्यूची नोंद झाली. तर ठाणे 31, नाशिक 17, पुणे 40, लातूर 12, औरंगाबाद 26, अकोला 3, लातूर 7, नागपूर 9 मृत्यू नोंदवले गेले. राज्यातील मृत्यूदर 2.1 टक्के इतका आहे. तर मृतांचा एकूण आकडा 1,32,335 वर पोहोचला आहे.

हेही वाचा: बारावीच्या निकालाबाबत अद्यापही अनिश्चितता कायम!

आज दिवसभरात 11,124 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 60,75,888 इतकी आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  96.59 टक्के एवढे झाले आहे.

हेही वाचा: २५ जिल्ह्यांमध्ये शिथिलता येणार; 'हे' ११ जिल्हे मात्र कडक निर्बंधातच

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,75,59,938 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,90,156 (13.23 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,87,704 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,245 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

loading image
go to top