esakal | Corona Update : राज्यात दिवसभरात 3,626 रुग्णांची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

maha_covid

Corona Update : राज्यात दिवसभरात 3,626 रुग्णांची नोंद

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : राज्यात रविवारच्या तुलनेत आज नव्या रुग्णांची आणि मृतांची संख्या कमी झाल्याने कोरोना संसर्गाचा जोर काहीसा ओसरल्याचे दिसले. आज राज्यात 3,626 नव्या रुग्णांची भर पडली. मृत्यूचा आकडा कमी झाला असून आज 37 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. मृतांचा एकूण आकडा 1,37,811 इतका झाला आहे.

हेही वाचा: IMD : दोन दिवसांत पुण्यासह राज्यात पावसाचा जोर वाढणार

औरंगाबाद, अकोला, नागपूर मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 6, नाशिक 10, पुणे 12, कोल्हापूर 5, लातूर 4 मृत्यू नोंदवले गेले. आज दिवसभरात 3,626 नवीन रुग्णांची नोंद झाली. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 64,89,800 झाली आहे.

हेही वाचा: Podcast: 'फेसबुकनं का मागितली माफी ते NEET परीक्षा येत्या रविवारीच'

राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या काहीशी कमी झाली असून 47,695 50,095 इतकी झाली. आज 5,988 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 63,00,755 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.09 टक्के एवढे झाले आहे.

हेही वाचा: 'कोविशिल्ड'चा दुसरा डोस चार आठवड्यात द्या; हायकोर्टाचे केंद्राला आदेश

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,49,99,475 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,89,800 (11.8 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,03,169 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 1,963 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

loading image
go to top