नितेश राणेंचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला

या हल्ल्याचा कट पुण्यात शिजल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Nitesh Rane
Nitesh RaneSakal

शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणे (Nitesh Rane) यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून हे प्रकरण चांगलचं गाजलं असून राजकीय वर्तुळात यावर चर्चांना उधाण आलं आहे. परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी संशयित आरोपी असलेल्या नितेश राणे (Nitesh Rane) यांना बुधवारी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या हल्ल्याचा कट पुण्यात शिजल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याची चौकशी सुरु आहे.

आमदार नितेश राणेंनी शरणागती पत्कारल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी (Court) देण्यात आली आहे. जामीन अर्जासाठी धावाधाव करत असताना आता त्यांचा कोठडीतील मुक्कामही वाढला आहे. भारतरत्न लता मंगेशकर (lata mangeshkar pass away) यांच्या निधनामुळे आज (सोमवारी) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आजची सुनावणी पुढे ढकलली आहे.

Nitesh Rane
संतोष परब हल्ला प्रकरण : नितेश राणे यांना पुण्यात आणणार?

दरम्यान, शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी ४ फेब्रुवारीला नितेश राणे (Nitesh Rane) यांची रवानगी कणकवली न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली होती. जेलमध्ये न जाता नितेश राणे यांनी प्रकृती अवस्थेचे कारण देत सिंधुदूर्ग जिल्हा (Sindhudurg District) रुग्णालयात दाखल झाले होते. नितेश राणेंच्या नियमित जामीनावर आज जिल्हा सत्र (District Court) न्यायालयात सुनावणी होणार होती. पण मात्र आज सार्वजनिक सुट्टी जाहीर झाल्यामुळे आजचे न्यायालयाचे कामकाज बंद असणार आहे. त्यामुळे नितेश राणेंच्या नियमित जामीनावर उद्या मंगळवारी सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेऊन मी कणकवलीच्या दिवाणी न्यायालयात दाखल होत असल्याची माहिती त्यांनी दिली होती. राज्यसरकाने बेकायदेशीरपणे मला अटक करण्याचा प्रयत्न केला. त्याचा निषेध करत असल्याचं राणे यांनी म्हटंल होतं. मात्र आता एक न्यायालयीन सुनावणी एक दिवस पुढे ढकलल्यामुळे राणे यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

Nitesh Rane
लोकराजाला कोकण झालं पोरकं; सुधीर कलिंगण यांचं निधन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com