पुणे : पतीकडे पोटगीची मागणी करणारी एका महिलेची याचिका पुण्यातील दिवाणी न्यायालयानं (Pune Court) फेटाळून लावली आहे. महिला एक मोठ्या कंपनीत इंजिनिअर असून ती स्वतःला सांभाळण्यास पूर्णपणे सक्षम आहे, असं निरीक्षण न्यायालयानं यावेळी नोंदवलं आहे.
एका २९ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. तसेच तिने पतीकडून पोटगी मिळावी यासाठी देखील याचिका दाखल केली होती. पती सीआरपीएफमध्ये काम करतो. त्यामुळे दरमहा २५ हजार रुपये पोटगी द्यावी, असं महिलेनं याचिकेत म्हटलं होतं. पण, न्यायालयानं तिची याचिका फेटाळून लावली आहे. पुण्यातील दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश माधवी खानवे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, ''ही महिला सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तिच्याकडे उदरनिर्वाहासाठी पुरेसे उत्पन्नाचे साधन आहे. त्यामुळे तिला पतीकडून पालनपोषणासाठी पैसे मागण्याचा अधिकार नाही.''
याचिकाकर्त्या महिलेचे छिंदवाडा येथे २०१७ मध्ये लग्न झाले होते. ती महिला पुण्यात एक मल्टीनॅशनल कंपनीत काम करते, तर तिचा पती दिल्लीत सीआरपीएफमध्ये कार्यरत आहे. लग्न झाल्यानंतर दोघांनीही आपआपल्या कामाच्या ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतला होता, असे महिलेने आपल्या याचिकेत म्हटलं आहे.
लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच सासरच्यांनी हुंड्यासाठी छळ सुरू केल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिलेने याचिकेत असेही म्हटले आहे की, यानंतर सासऱ्यांनी तिला तिच्या माहेरी परत जाण्यास सांगितले. सासरच्या मंडळींनी तिला उपाशी देखील ठेवल्याचा आरोप केला. त्याचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला. त्यांनी शिवीगाळ देखील केलं, असे आरोपही महिलेने याचिकेत केले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.