BMC Election: मुंबई महापालिकेच्या प्रभागाचा विषय सुप्रीम कोर्टात! ठाकरे गटाचा मोठा निर्णय

ठाकरे गटाची याचिका नुकतीच हायकोर्टानं फेटाळून लावली होती.
bmc election shiv sena uddhav thackeray
bmc election shiv sena uddhav thackeray sakal

नवी दिल्ली : मुंबई महापालिकेतील प्रभाग रचनेचा विषय आता सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. प्रभाग रचनेबाबतचा ठाकरे सरकारचा निर्णय सत्तेत आल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारनं बदलला होता. (Decision on ward structure in BMC is now appealed in SC Thackeray group filed petition)

bmc election shiv sena uddhav thackeray
Court Suggestion to Rahul Gandhi: सूरत कोर्टानं याचिका फेटाळल्यानंतर राहुल गांधींना दिला 'हा' सल्ला!

माध्यमांतील वृत्तांनुसार, मुंबई महापालिकेतील प्रभाग संख्या आधी २२७ इतकी होती. पण उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यानंतर या सरकारनं यात बदल करुन प्रभाग संख्या २३६ केली होती. पण राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारनं प्रभाग संख्येत बदल करुन ही संख्या पुन्हा पूर्वीसारखीचं म्हणजेच २२७ केली. पण हा निर्णय फिरवण्यात आल्यानं याविरोधात ठाकरे गटाचे नगरसेवक राजू पेडणेकर आणि समीर देसाई यांनी हायकोर्टात धाव घेतील होती. हायकोर्टानं नुकतीच त्यांची ही याचिका फेटाळून लावली.

bmc election shiv sena uddhav thackeray
Bilawal Bhutto in Goa: पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो गोव्याच्या दौऱ्यावर! जाणून घ्या डिटेल्स

दरम्यान, हायकोर्टाच्या दणक्यानंतर ठाकरे गटानं आता सुप्रीम कोर्टात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील दोन दिवसांत ठाकरे गट सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे.

bmc election shiv sena uddhav thackeray
Same sex relationship : समलिंगी संबंध एकवेळचं नातं राहिलं नाही, ते आता...; सरन्यायाधीशांची टिप्पणी

निर्णय दुजाभाव करणारा

राज्यातील अनेक नगरपरिषदांमधील नगरसेवकांची वाढवलेली संख्या कायम ठेवताना केवळ मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची संख्या कमी करण्याचा सरकारचा निर्णय दुजाभाव करणारा असल्याचा आरोप ठाकरे गटानं केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com