Deepak Kesarkar : इंग्रजीच्या अट्टाहासातून बाहेर पडा; शालेय शिक्षणमंत्री असं का म्हणाले?

Deepak Kesarkar
Deepak Kesarkar

मुंबई : आपली भारतीय शिक्षण पद्धती उपयुक्त आहे. आपल्या या शिक्षण पद्धतीबरोबरच जगातील दर्जेदार आणि अद्ययावत शिक्षण पद्धती अथवा अभ्यासक्रमांचा अवश्य स्वीकार करा. इंग्रजीच्या अट्टहासातून बाहेर पडा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज मुंबईत केले.

Deepak Kesarkar
NCP अध्यक्षपदाच्या गोंधळात रोहित पवारांना धक्का; ४.५० लाखांचा दंड

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) नियामक मंडळाची २५१ वी सभा आज शालेय शिक्षण मंत्री तथा मंडळाचे अध्यक्ष केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झाली. त्या वेळी ते बोलत होते. केसरकर पुढे म्हणाले की, भारतीय संस्कृती आणि शिक्षण पद्धती पुरातन आहे.

विद्यार्थ्यांना हसतखेळत शिकवल्यास अभ्यास कायम लक्षात राहतो. बालभारतीची पुस्तके आणि त्यासाठी साठवायचा पेपर खराब होणार नाही, याची दक्षता घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. दुर्गम भागातील ज्या शाळांमध्ये नेटवर्क नाही, त्यांची माहिती घेऊन त्या उपग्रहाद्वारे जोडण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची सूचना मंत्री केसरकर यांनी केली. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर आवडीची पुस्तकेदेखील शाळेत उपलब्ध करून द्या, असेही त्यांनी सांगितले.

Deepak Kesarkar
New NCP Chief: राष्ट्रवादी अध्यक्षपदासाठी पवारांच्या सख्ख्या बहिणीनं सुचवलं बड्या नेत्याचं नाव

यावेळी प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे संचालक तथा माध्यमिक शिक्षण संचालक आणि नियामक मंडळाचे सदस्य सचिव कृष्णकुमार पाटील तसेच संबंधित अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com