
पणजी : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मोठे नेते असून त्यांच्या विरोधात आम्ही बोलणार नाही. योग्य वेळी त्यांच्याशी बोलू. सर्व गैरसमज दूर होतील असे विधान शिवसेनेचे आमदार आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केले आहे. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आम्हाला सर्वांना एक सुखद धक्का बसल्याचेही सांगितले. शिंदे यांना मुख्यमंत्री पदासाठी संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) आभार मानले. (Deepak Kesarkar Latest News )
बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि मोदींचे अत्यंत जवळचे संबंध होते. त्यामुळे शिंदे यांना मुख्यमंत्री पद देऊन एका अर्थाने बाळासाहेबांची जी इच्छा होती ती पूर्ण केली आहे. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shaha) आणि जे पी नड्डा (J P Nadda) यांचेदेखील महत्त्वाचे योगदान असल्याचे केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी जो मनाचा मोठेपणा दाखवला तो खरंच खूप महत्त्वाचा असल्याचेही केसरकर म्हणाले.
आमदरांच्या जल्लोषाबाबत स्पष्टीकरण
मुख्यमंत्रीपदी शिंदेनी शपथ घेतल्यानंतर गोव्यातील आमदरांनी आनंदाच्या भरात डान्स (Shivsena MLA Dance Video ) केल्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात समोर आले होते. त्यामुळे अशा प्रकारची कृती आमदारांकडून चुकूनही होता कामा नये असा सल्ला शिंदे यांनी आम्हा सर्वांना दिल्याचे त्यांनी सांगितले. कारण तुम्ही सर्वजण मला रिप्रेझेंट करता तुमच्या सर्वांवर एक जबाबदारी आहे. मात्र, अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करून आमच्या सर्व आमदारांची नाहक बदनामी केली जात असल्याचे ते म्हणाले.
या व्हिडिओमध्ये दिसून येणारे बरेच आमदार हे झोपेतून उठून आले होते. त्यामुळे त्यांना ही बातमी सुखद धक्कादायक होती. त्यामुळे त्यांनी आनंदाच्या भरात डान्स केला. हा जल्लोष ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याची नव्हती तर, त्यांची आमदारकी रद्द करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टान फेटाळल्याबद्दल होता. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने या व्हिडिओमधून कोणताही चूकीचा अर्थ काढू नये असे आवाहन केसरकर यांनी यावेळी केले. यापुढील काळ काम करण्याचा असल्याचेही ते म्हणाले.
महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा CM शिंदेंचा निर्धार!
महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा निर्धार नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी पणजीत पत्रकार परिषदेत बोलताना दिली. जेव्हा एका शेतकऱ्याचा मुलगा महाराष्ट्राच्या कृषीमंत्रीपदी बसतो तेव्हा त्यांचे विचार कसे असतात हे समजून घेणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचा निर्धार केला आहे.
राजकीय लढाई संपल्यानंतर आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर महाराष्ट्राचा जनतेला दिलासा देण्याचं पहिलं पाऊल मुख्यमंत्री शिंदे यांनी टाकलं असल्याचे केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले. आजच्या कृषीदिनी शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना केवळ श्रद्धांजली अर्पण केली नाही तर शपथ घेतली की, हा महाराष्ट्र मी शेतकरी आत्महत्या करुन दाखवेन" असा विश्वास शिंदे यांनी आज व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.