esakal | बेळगाव निवडणूक आणि चिपी विमानतळ उद्घाटनावरून फडणवीसांचा सेनेवर निशाणा
sakal

बोलून बातमी शोधा

devendra Fadanvis

राऊतांच्या अहंकाराचा पराभव; फडणवीसांचा घणाघात

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - देवेंद्र फडणवीस यांच्यावर गोव्याच्या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी भाजपने दिली आहे. याआधी त्यांच्यावर बिहारची जबाबदारी मिळाली. तिथं भाजपला यश मिळालं असून आता भाजपनं मिशन गोवा फडणवीसांकडे सोपवलं आहे. यावेळी बेळगाव निवडणूक आणि चिपी विमानतळ उद्घाटनावरून फडणवीस यांनी सेनेवर निशाणा साधला. फडणवीस म्हणाले की, बेळगावात मराठी माणसाचा नाही तर संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव झाला.

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांना बोलावण्याची गरज नाही असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं. याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, समन्वयाने ही गोष्ट व्हायला पाहिजे. चिपी विमानतळाच्या कामात राणेंचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना बोलवायचे की नाही या प्रश्नाला बगल दिली.

'आता चिपी विमानतळ सुरु होणार आहे. अशा परिस्थिती वाद न करता कोकणच्या पर्यटनाला चालणा मिळणार आहे हे महत्त्वाचं. यासाठी राणेंचे आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांचे अभिनंदन', असे फडणवीस म्हणेल. तसंच यामध्ये श्रेयवादाची कोणती लढाई नसून केंद्राने आणि राज्याने समन्वयाने काम करायचे असते असंही त्यांनी म्हटलं.

हेही वाचा: चिपी विमानतळ: उद्घाटनाला नारायण राणेंना बोलवणार? सुभाष देसाई म्हणाले....

भाजप नेते किरिट सोमय्या यांना केंद्राकडून झेड सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. यावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एखाद्याला केंद्राकडून सुरक्षा दिली गेली असेल तर त्या सुरक्षे संदर्भात केंद्रीय संस्था आढावा घेत असतात. संबंधित व्यक्तींच्या जीवाला धोका असेल किंवा कमी झाला असेल तर थेट सुरक्षा वाढवण्याचा किंवा कमी कऱण्याचा निर्णय घेतला जातो. त्याला राजकीय अर्थ देण्याचं कारण नाही अशंही फडणवीसांनी सांगितलं.

loading image
go to top