सत्तेचा अहंकार डोक्यात, देवेंद्र फडणवीसांची महाविकास आघाडीवर टीकास्त्र

ज्यांनी ज्यांनी ही कारवाई केली. त्या बारा आमदारांच्या विधानसभेतील मतदारांची माफी मागावी.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavisटिम ई सकाळ

मुंबई : बारा ही आमदार पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभेत सहभागी होण्यास पात्र ठरविले आहे. उपाध्यक्षांच्या चेंबरमध्ये षडयंत्र रचून बारा लोकांना निलंबित करण्यात आले होते. कृत्रिम बहुमत बनवण्यासाठी निलंबन करण्यात आले होते. हे एक प्रकारे महाराष्ट्र सरकारला व त्यांच्या असंवैधानिक कृत्याला चपराक आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. आज शुक्रवारी (ता.२८) सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेतील १२ भाजप आमदारांचे निलंबन रद्द केले आहे. याबाबत फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मत व्यक्त केले. फडणवीस म्हणाले. खरे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला (Maharashtra Government) संधी दिली होती. अधिवेशनापूर्वी सुनावणी झाली होती. हे जे बारा आमदार आहेत त्यांनी अध्यक्षांकडे अर्ज करावा. (Devendra Fadnavis Attack On Mahavikas Aghadi Government For 12 BJP MLAs Suspension)

Devendra Fadnavis
सत्यमेव जयते ! देवेंद्र फडणवीसांची सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया

परंतु सत्तेचा अहंकार डोक्यात असल्यामुळे. माझ्या सहित सगळ्यांचे मत आहे, की विधानसभेतील कारवाई न्यायालयाच्या बाहेर असायला हवे. आज ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयानंतर हे षडयंत्र करणारे कोण होते. ज्यांनी ज्यांनी ही कारवाई केली. त्या बारा आमदारांच्या (BJP) विधानसभेतील मतदारांची माफी मागावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com