'मुंगेरीलाल के हसीन सपने', पराभवावरून फडणवीसांचा काँग्रेसला टोला

Devendra Fadnavis on Congress Defeat Five States Assembly Election
Devendra Fadnavis on Congress Defeat Five States Assembly Electiongoogle

नागपूर : पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) दारुण पराभव झाला. त्यावरून देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) काँग्रेसला टोला लगावला आहे. आमचे अनेक विरोधक देव पाण्यात घालून बसले होते. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा सर्वच त्यांच्या हातातून गेलं. यांचं स्वप्न स्वप्नच राहिलं. 'मुंगेरीलाल के हसीन सपने' फक्त राहिले, असं फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis on Congress Defeat Five States Assembly Election
सेनेचा मुख्यमंत्री असताना औरंगाबादचे संभाजीनगर केव्हा होणार? : देवेंद्र फडणवीस

गोवा निवडणुकीत (Goa Election) भाजपला यश मिळाल्यानंतर आज देवेंद्र फडणवीसांचं त्यांच्या होमपीचवर स्वागत करण्यात आलं. यावेळी फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) देखील उपस्थित होते. ''पंतप्रधान मोदी, टीम गोवा आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. गोव्याच्या जनतेने प्रचंड आशीर्वाद दिला आहे. मोदींनी सामान्य जनतेत विश्वास निर्माण केला. त्यामुळे चार राज्यांत इतकं यश मिळालं आहे. कोरोनापासून मुक्ती देण्याचं काम मोदींच्या माध्यमातून झालं. युक्रेनमध्ये अडकलेल्या २० हजार लोकांना बाहेर काढण्याचं काम मोदी सरकारने केलं. त्यामुळे जनतेने आम्हाला कौल दिला आहे'', असंही फडणवीस म्हणाले.

काँग्रेसह इतर पक्षांना टोला -

आमचे अनेक विरोधक देव पाण्यात घालून बसले होते. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा सर्वच त्यांच्या हातातून गेलं. यांचं स्वप्न स्वप्नच राहिलं. मुंगेरीलाल के हसीन सपने फक्त राहिले. काँग्रेस आणि इतर पक्ष जनतेपासून तुटलेले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीची लढाई नोटाशी होती. नोटाला देखील त्यांच्यापेक्षा चांगली मते मिळाली आहे, असा खोचक टोला फडणवीसांनी लगावला.

महापालिकेसाठी फुंकलं रणशिंग -

महाविकास आघाडी सरकारचा बुरखा आम्ही टराटरा फाडतोय. ही महाविकास आघाडी नाहीतर महावसुली आघाडी आहे. यांचे दोन मंत्री तुरुंगात आहे. आमच्या नेत्यांविरोधात खोट्या केसेस दाखल झाल्या. पण, यांनी कितीही गुन्हे दाखल केले तरी आम्ही शांत बसणार नाही. यांचा भ्रष्टाचारी चेहरा समोर आणल्याशिवाय राहणार नाही, असं फडणवीस म्हणाले. त्यानंतर त्यांनी महापालिका निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले. महापालिका, जिल्हा परिषद आणि येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपचा एकहाती विजय होईल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com