Dr Bharti Pawar : कांदानिर्यात शुल्काविरोधात पुनर्विचार करावा; डॉ. भारती पवारांची गोयल यांच्याकडे मागणी

While giving a letter to the Union Commerce Minister Piyush Goyal, Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar.
While giving a letter to the Union Commerce Minister Piyush Goyal, Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar.esakal

Dr Bharti Pawar : कांद्याच्या निर्यात शुल्कवाढीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारमार्फत लावण्यात आलेल्या या निर्यात शुल्काविरोधात पुनर्विचार करावा, अशी मागणी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली.(dr bharti pawar request piyush goyal about onion export duty nashik news )

दिल्लीत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी पीयूष गोयल यांची भेट घेतली. कांदा दरवाढीच्या भीतीने केंद्र सरकारने ४० टक्के निर्यात शुल्क लादण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरून शेतकरी आक्रमक होत रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले होते.

यानंतर केंद्र सरकारने दोन लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेत कांद्याला दोन हजार ४१० रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याचे जाहीर केले. मात्र, त्यानंतरही कांदा व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव झाला नाही.

त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. बैठकीत कांद्याच्या प्रश्नावर तोडगा काढत कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद मागे घेत असल्याचे जाहीर करत लिलाव सुरू केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

While giving a letter to the Union Commerce Minister Piyush Goyal, Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar.
Dr Bharti Pawar : 'एनसीसीएफ'कडील कांद्याला 350 प्रतिक्विंटल अनुदान द्या; डॉ. पवार यांनी वेधले लक्ष

परंतु त्यानंतरही शेतकऱ्यांनी बाजार समित्या बंद ठेवत आंदोलन केले होते. नाफेडकडूनही कांदा खरेदी सुरू झाली आहे.

या पार्श्वभूमीवर डॉ. पवार यांनी वाणिज्यमंत्री गोयल यांची भेट घेत पत्र दिले. कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ करण्यात आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारमार्फत लावण्यात आलेल्या या निर्यात शुल्काविरोधात पुनर्विचार करावा, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली. डॉ. पवार यांनी जिल्ह्यातील कांद्याची सद्यःस्थिती मांडली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्यासाठी शुल्काचा पुनर्विचार करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

While giving a letter to the Union Commerce Minister Piyush Goyal, Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar.
Dr Bharti Pawar : केंद्र सरकार 2 लाख टन कांदा खरेदी करणार : डॉ. पवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com