सध्या बाप विसरणाऱ्यांची कमी नाही, खडसेंचा महाजनांना खोचक टोला

एका वाहिनीला मुलाखत देताना गिरीश महाजन यांनी कोण एकनाथ खडसे? असा सवाल उपस्थित केला.
Political
Political eskal
Summary

एका वाहिनीला मुलाखत देताना गिरीश महाजन यांनी कोण एकनाथ खडसे? असा सवाल उपस्थित केला.

राजकीय वातावरणात कधी कोण कुणा विरोधात टिका करेल सांगता येत नाही. सध्या एकनाथ खडसे यांच्या अशाच एका वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. त्यांनी भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना राजकारणात आपण आणलं, त्यांना घडवलं, हे सगळ्या जगाला माहीत आहे. मात्र बापाला विसरणारे अनेक लोक आता जन्माला आले आहेत, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.

मागील काही दिवसांपासून भाजपचे गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोप करत असताना एका वाहिनीला मुलाखत देताना गिरीश महाजन यांनी कोण एकनाथ खडसे? असा सवाल उपस्थित केला होता. त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देत खडसे यांनी टोला लगावला आहे.

Political
आशिष मिश्रांच्या जामिनाविरोधात पीडित शेतकऱ्यांचे कुटुंबिय सुप्रीम कोर्टात

गिरीश महाजन यांच्या प्रश्नांना उत्तर देताना एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे की, गिरीश महाजन हे आता भाजपचे राष्ट्रीय नेते झाले आहेत. त्यामुळे मी त्यांच्यासाठी लहान कार्यकर्ता झालो आहे. मात्र असं असलं तरी गिरीश महाजन यांना राजकारणात आपण आणलं, घडवलं आहे. त्यांना तिकीट मिळवून देण्यात आणि विजय मिळवून देण्यात मदत केली असल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.

ते म्हणाले, सध्याच्या काळात बापाला विसरून जाणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. सगळ्या जगाला माहीत आहे की, त्यांना राजकारणात कोणी आणलं, वाढवलं, आता परिस्थिती बदलली आहे. गिरीश महाजन हे आता स्वत: च्या बळावर भाजपला निवडून आणतील, अशी शक्यता आता राहिलेले नाही. त्यामुळं आगामी काळात निवडणुका जवळ असल्यानं कोण किती पाण्यात आहे? हे दिसून येणार असल्याचंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

Political
तेजस्वींचा प्रश्न; देशात एकच घोटाळा झाला आहे का? एकच नेता आहे का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com