
शिंदे-ठाकरे संघर्ष पेटला! आता सुरक्षेवरून शिंदे गटाचा थेट उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
मुंबई - शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी 40 हून अधिक आमदारांना सोबत घेऊन मुख्यमंत्रीपदावरील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पायउतार केलं आणि मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. आता शिंदे गट तयार झाला असून शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात कलगीतुरा रंगला होता. मात्र शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात येत नव्हती. मात्र आता शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्ला करण्यात येत आहे. (Eknath Shinde and Uddhav Thackeray conflict news in marathi)
हेही वाचा: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत CM एकनाथ शिंदेंचं 'मिशन 200' फेल!
शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे, दादा भुसे आणि दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा आरोप केला आहे. एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना झेड सिक्युरीटी नाकारली होती, असा आरोप भुसे, कांदे आणि केसरकर यांनी केला. यावरून आता राजकारण तपल आहे.
एकनाथ शिंदे नक्षलग्रस्त गडचिरोलीचे पालकमंत्री होते. त्यांच्या काळात अनेक नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई झाली होती. त्यात अनेक नक्षलवादी मारले गेले होते. त्यामुळे त्यांना धमकीचं पत्र मिळालं होतं. मात्र उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना झेड सुरक्षा देण्याचं टाळलं होतं, असंही शिंदे गटाने म्हटलं आहे.
हेही वाचा: आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा आदर्श घ्यावा- दीपक केसरकर
यावर आता आदित्य ठाकरेंकडून प्रतिक्रिया आली. आदित्य म्हणाले की, बंडखोरीला हिंमत लागते आणि गद्दारीला कारणं लागतात. तर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं की, आता का बोलत आहेत. मग त्याचवेळी का नाही बोलले. तुम्ही किती खरं बोलता हे सर्वांना कळत असंही पेडणेकर यांनी म्हटलं.
दरम्यान काँग्रेसनेते सतेज पाटील म्हणाले की, सुरक्षेसंदर्भातील एक समिती असते. ती समिती थ्रेट अनालिसीस करते. त्यानंतर एसआयडीचा रिपोर्ट येतो. त्यानंतर सुरक्षा पुरवण्यात येते. त्यात मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री हस्तक्षेप करत नसतात. ती समिती चिफ सेक्रेटरींच्या अंडर असते. त्यामुळे मला वाटत नाही, अशापद्धतीचं काही झालं असेल.
हेही वाचा: मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? CM एकनाथ शिंदेंनी दिली माहिती
नक्षलवाद्यांनी म्हटंल होतं, धमकीच्या पत्राला ''स्टंट''
नक्षलवाद्यांकडून मिळालेलं धमकीचं पत्र एकनाथ शिंदे यांचा स्टंट आहे. त्यामुळे त्यांच्या स्टंटबाजीचा आम्ही निषेध करतो, असं पत्रक नक्षलवादी संघटनेचे प्रवक्ते श्रीनिवास यांनी काढलं होतं. तसेच लोहखनिज लीजवरून एकनाथ शिंदे आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केला केली होती.
Web Title: Eknath Shinde And Uddhav Thackeray Conflict
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..