Sanjay Shirsat : वेळोवेळी डावललेल्या संजय शिरसाटांना कामाख्या देवी पावणार?

शिवसेनेसोबत बंड पुकारत एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात पाच महिन्यांपूर्वी मोठा राजकीय भूकंप घडवला होता.
Sanjay Shirsat
Sanjay ShirsatSakal
Updated on

Eknath Shinde Guwahati Tour : शिवसेनेसोबत बंड पुकारत एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात पाच महिन्यांपूर्वी मोठा राजकीय भूकंप घडवला होता. यानंतर अनेक राजकीय घडामोडींनी वेग घेत अखेर शिंदे गट आणि भाजपने एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केले.

हे ही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Sanjay Shirsat
CM एकनाथ शिंदे यांना शिवसेनेची मोठी ऑफर; तर आम्ही तिघी धुमधडाक्यात...

सत्ता स्थापनेनंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी सर्वदूर चर्चा होती. मात्र, स्वतः फडणवीसांनीच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे पदभर स्वीकारतील असे जाहीर केले आणि सामान्यांसह विरोधकांच्याही भूवया उंचावल्या.

या सर्व राजकीय घडामोंडीमध्ये शिंदे-फडणवीसांनी त्यांच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार केला. मात्र, त्यानंतर शिंदे गटातील काही दिग्गजांना संधी न देण्यात आल्याने शिंदे गटात नाराजीचं वातावरण पसरलं होते. यात सर्वाधिक नाराज आमदारांमध्ये संयज शिरसाट यांचे नाव आघाडीवर होते.

Sanjay Shirsat
कर्जतमध्ये उभे राहणार भव्य कामाख्या मंदिर

त्यानंतर आज पाच महिन्यांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार पुन्हा गुवाहाटी दौऱ्यावर गेले आहेत. या ठिकाणी हे एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. यात नाराज संजय शिरसाटांचाही समावेश आहे. त्यात आता पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिंमंडळ विस्ताराची चर्चा जोर धरू लागली असून, दुसऱ्या विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यावेळच्या मंत्रिमंडळ विस्तारात तरी वेळोवेळी डावललेल्या संजय शिरसाटांना संधी मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Sanjay Shirsat
Eknath Shinde Group: शिंदे गटातील आमदार नाराज? गुवाहाटी दौऱ्याला जाणार नसल्याने चर्चांना उधाण

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार विस्तार?

एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार आज गुवाहाटीत दाखल झाले आहेत. गुवाहाटीहून परतल्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे. शिंदे आणि आमदरांच्या गुवाहाटी दौऱ्यात दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा होणार का? आणि झाल्यास त्यात संजय शिरसाटांच्या नावाचा विचार होणार का? हे पाहणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.

Sanjay Shirsat
संजय शिरसाट आमच्या संपर्कात, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा दावा | Sakal

मंत्रीपदासाठी नाराज नाही

दरम्यान, मंत्रीपदाच्या यादीत जरी संजय शिरसाट यांना यापूर्वी डावलण्यात आलेले संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चेने मध्यंतरीच्या काळात जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, मंत्रीपदासाठी आपण नाराज नसल्याचे शिरसाटांनी वारंवार सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com