#स्पर्धापरीक्षा - 'हार्ट ऑफ एशिया' परिषद

डॉ. शैलेंद्र देवळाणकर 
बुधवार, 21 जून 2017

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील लेख www.esakal.com वर प्रसिद्ध करण्यात येत आहेत. 

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी 
http://sakalpublications.com वर पुस्तके उपलब्ध आहेत. 

'हार्ट ऑफ एशिया' या परिषदेला 'इस्तंबूल प्रक्रिया' असेही म्हणतात. इस्तंबूल ही तुर्कस्तानची राजधानी. या संघटनेची स्थापना आणि पहिली परिषद ही इस्तंबूलमध्ये झाली. 

या परिषदेच्या स्थापनेची पार्श्‍वभूमी अशी -
1996 ते 2002 या काळामध्ये अफगाणिस्तानात तालिबानचे वर्चस्व होते. या काळामध्ये केवळ दक्षिण आशियाच दहशतवादाला बळी पडला असे नाही, तर संपूर्ण जगाला याची किंमत मोजावी लागली. कारण तालिबानी राजवटीच्या काळात अफगाणिस्तान हा दहशतवादाचे एक मोठे केंद्र बनला. तसेच दहशतवाद्यांची निर्यात करणारी एक फॅक्‍टरी म्हणून अफगाणिस्तान ओळखला जाऊ लागला. त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये सातत्याने यादवीयुद्ध झाले आणि ते आजही काही प्रमाणात सुरूच आहे. 

त्यामुळे या राष्ट्रामध्ये लोकशाही शासन जर टिकले नाही, अफगाणिस्तान जर पुन्हा धार्मिक मूलतत्त्ववादाला आणि दहशतवादाला बळी पडला तर त्याचे अतिशय घातक परिणाम संपूर्ण जगावर होण्याची शक्‍यता आहे. म्हणूनच अफगाणिस्तानमध्ये शांतता आणि स्थैर्य टिकवणे ही एकट्या अमेरिकेची जबाबदारी नसून ती सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी विभागीय सहकार्याच्या माध्यमातून अफगाणिस्तानमध्ये शांतता आणि स्थैर्य टिकवणे आवश्‍यक आहे. यासाठीची प्रक्रिया ही 'इस्तंबूल प्रक्रिया' म्हणून ओळखली जाते. 

'हार्ट ऑफ एशिया' चा मूळ प्रस्ताव अमेरिकेने मांडला होता. अफगाणिस्तानातील शांततेसाठी सामूहिक राजकीय सल्लामसलतीची गरज आहे आणि ती घडून यावी हा यामागचा एक उद्देश होता. तसेच अफगाणिस्तानात कशा प्रकारची सुरक्षायंत्रणा तयार केली जावी आणि त्यासाठी पैसा कसा उभा करायचा या सर्व गोष्टींना मार्ग दाखवण्यासाठी विभागीय चर्चा करण्यासाठी हे व्यासपीठ तयार करण्यात आले. 
अफगाणिस्तानमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तालिबान, अल्‌ कायदा आणि आता इस्लामिक स्टेट यांसारख्या संघटना आपल्या शक्तिप्रदर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडवून आणत आहेत. या हिंसाचारावर नियंत्रण ठेवणे एकट्या अफगाणिस्तानला शक्‍य नाही. त्यासाठी अफगाणिस्तान आणि इतर काही राष्ट्रांनी मिळून सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने इराक आणि सिरियामधील काही भूभागावर आपले साम्राज्य प्रस्थापित केलेले आहे. या संघटनेच्या हिंसाचाराचे चटके संपूर्ण जगाला बसत आहेत. अफगाणिस्तान- 
मध्ये अशाच प्रकारच्या एखाद्या दहशतवादी संघटनेने पुन्हा एकदा आपले साम्राज्य प्रस्थापित केल्यास त्याची खूप मोठी किंमत जगाला चुकवावी लागू शकते. यासाठी काळजी घेणे आवश्‍यक आहे. यादृष्टीने हार्ट ऑफ एशियासारख्या परिषदांचे आयोजन केले जाते. 

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील आणखी लेख वाचा -

#स्पर्धापरीक्षा -भारताची पहिली एकात्मिक संरक्षण-संदेशवहन प्रणाली

#स्पर्धापरीक्षा - 'पीएसएलव्ही' अग्निबाणाचे प्रक्षेपण

#स्पर्धापरीक्षा - 'आयएनएस चेन्नई'

#स्पर्धापरीक्षा - 'झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट' योजना

#स्पर्धापरीक्षा - नोटाबंदी

#स्पर्धापरीक्षा - मनरेगा योजना

#स्पर्धापरीक्षा - भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा 'नाविक'

#स्पर्धापरीक्षा - भारताचे रणगाडा विरोधी नाग क्षेपणास्त्र

#स्पर्धापरीक्षा - राष्ट्रीय फलोत्पादन अभियान

#स्पर्धापरीक्षा - भारत आणि ब्रिक्स परिषद

#स्पर्धापरीक्षा - भारत आणि रशियादरम्यान संरक्षण, ऊर्जा क्षेत्रांत करार

#स्पर्धापरीक्षा - बलुचिस्तान

#स्पर्धापरीक्षा - प्रधानमंत्री पीक विमा योजना

#स्पर्धापरीक्षा - अलिप्ततावादी चळवळीविषयी

#स्पर्धापरीक्षा - रिओ ऑलिंपिक स्पर्धा 2016

#स्पर्धापरीक्षा - गुगल प्रोजेक्ट लून

#स्पर्धापरीक्षा -'स्टॅंड अप इंडिया' योजना

#स्पर्धापरीक्षा - बौद्धिक संपदा हक्क धोरण

#स्पर्धापरीक्षा - 'कृषी विज्ञान केंद्र ज्ञान तंत्र' पोर्टल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: esakal news competitive exam series upsc mpsc heart of Asia