#स्पर्धापरीक्षा - 'पीएसएलव्ही' अग्निबाणाचे प्रक्षेपण

PSLV
PSLV

'पीएसएलव्ही' अग्निबाणाचे प्रक्षेपण

  • श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातील दुसऱ्या उड्डाण मंचावरून पीएसएलव्ही रॉकेटनं 22 जून 2016 रोजी सकाळी बरोबर 9 वाजून 26 मिनिटांनी वीस उपग्रहांसह अवकाश तळ सोडला. 
  • यानंतर बरोबर 16.7 सेकंदांनी पीएस-1 चं ज्वलन पूर्ण झालं आणि तो रॉकेटपासून अलग झाला आणि 0.2 सेकंदाच्या अंतरानं दुसऱ्या चरणाच्या (पीएस-2 च्या) ज्वलनाला सुरवात झाली.
  • या पीएस-2 नं अग्निबाणाला दोन मिनिटे चाळीस सेकंद एवढा अवधी जोर पुरवला आणि तो अलग झाला. 
  • यानंतर पीएस-3 या घन-प्रणोदकाचं ज्वलन आणि अलग होण्याच्या क्रिया नियोजना-प्रमाणं वक्तशीर झाल्या. 
  • लिफ्ट-ऑफनंतर 16 मिनिटांनी प्रक्षेपित करावयाच्या 20 उपग्रहांना 508 कि.मी. उंचीवर अचूकपणे नेण्यात आले. यापुढील 10 मिनिटांत क्रमाक्रमानं त्यांचं अवकाशात प्रक्षेपण करायची वेळ आली होती. 

पहिल्यांदा 'कार्टोसॅट-2' या भारताच्या मुख्य उपग्रहाचं प्रक्षेपण झालं. यानंतर चेन्नई येथील सत्यभामा युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या 'सत्यभामासॅट' या 1.5 किलो वजनाच्या उपग्रहाचं प्रक्षेपण झाले. इन्फ्रारेड स्पेक्‍ट्रोस्कोपद्वारे वातावरणातील हरितगृह (ग्रीनहाऊस) वायूंचे मोजमापन हा याचा उद्देश आहे. 

यानंतर पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या (सीओईपी) विद्यार्थ्यांनी बनविलेल्या'स्वयम्‌'चे प्रक्षेपण झालं. 'हॅम' उपयोजिकांसाठी पृथ्वीवरील दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या बिंदूंमध्ये संदेशवहन करण्यासाठी याचा लाभ होणार आहे. तंत्रज्ञानदृष्ट्‌या याचं वैशिष्ट्‌य असे, की पृथ्वीवरील चुंबकीय लहरींच्या आधारे तो स्थिर राहील. अशा प्रकारचं तंत्रज्ञान भारतात पहिल्यांदाच वापरण्यात येत आहे. त्याची इतर कार्ये देखील सौरऊर्जेवर चालतील.
 
त्यानंतर इंडोनेशियाच्या 115 किलो वजनाच्या 'लपन-ए 3' या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. इंडोनेशिया देशाच्या भूभागाचा होत असणाऱ्या उपयोगाची देखरेख करण्यासाठी आणि पर्यावरणामुळं घडत असलेल्या त्यांच्यावरील बदलांचा अभ्यास करण्यासाठी हा उपग्रह आहे. 
त्यानंतर प्रक्षेपण झाले ते जर्मन नॅशनल स्पेस एजन्सीच्या 150 किलो वजनाच्या 'बायस्पेक्‍ट्रल इन्फ्रारेड ऑप्टिकल सिस्टिम (बिरॉस)' या उपग्रहाचं. याचं आयुष्य पाच वर्षांचं असून, त्या देशाच्या भूभागावरच्या उच्च तापमानाच्या स्रोतांचा मागोवा घेणं आणि त्याद्वारे जंगल-वणव्यांचा शोध घेणं हा त्याचा प्रमुख उद्देश आहे. 

त्यानंतर कॅनेडियन स्पेस एजन्सी आणि डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॅनडा यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या मॅरिटाइम मॉनिटरिंग अँड मेसेजिंग मायक्रो सॅटेलाईट (एम 3 एम सॅट)' या 85 किलो वजनाच्या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं. 

त्यानंतर प्रक्षेपण झाले ते 85 किलो वजनाच्या चार 'स्टॅन्फोर्ड' विद्यापीठाच्या पदवीधारकांनी संस्थापित केलेल्या गुगल च्या एका कंपनीच्या 'स्काय सॅट जेन 2' उपग्रहाचं. 'हाय डेफिनेशन व्हिडिओचे प्रसारण' आणि भूपृष्ठावरील 1 मीटर * 1 मीटरहून कमी आकाराची वस्तू ओळखणं हे त्याचे उद्देश आहेत. 

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील आणखी लेख वाचा -

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com