विकसक - म्हाडाच्या कारभारात माजी सैनिकाची फरफट; सोडत जिंकल्यानंतरही घरासाठी प्रतीक्षा

तेजस वाघमारे
Friday, 14 August 2020

म्हाडाच्या पुणे मंडळामार्फत ऑगस्ट 2019 मध्ये विविध घरांची सोडत काढली. या सोडतीमध्ये माजी सैनिक दिलीपराव चव्हाण यांना योजना क्रमांक 265 मध्ये ए-विंग 304 क्रमांकाची सदनिका मिळाली.

मुंबई : देशाच्या सीमेवर लढणाऱ्या आजी-माजी सैनिकांबाबत सर्वच प्रेम, आदर व्यक्त करतात. मात्र, म्हाडाच्या पुणे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी माजी सैनिकाला गेली वर्षभर घरासाठी वेठीस धरले आहे. सोडतीमध्ये विजेते ठरलेले माजी सैनिक दिलीपराव चव्हाण यांच्याकडे विकसक घराचा ताबा देण्यासाठी अतिरिक्त रक्कम मागत आहेत. म्हाडा आणि विकसक यांच्या टोलवाटोलवीत माजी सैनिकाची फरफट होत आहे. याप्रकरणी न्याय मिळावा, यासाठी चव्हाण यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना पत्र लिहिले आहे.

कामगार तर मुंबईत परतायत; मात्र हाताला पुरेसे कामच नसल्याने करायचे तरी काय?

म्हाडाच्या पुणे मंडळामार्फत ऑगस्ट 2019 मध्ये विविध घरांची सोडत काढली. या सोडतीमध्ये माजी सैनिक दिलीपराव चव्हाण यांना योजना क्रमांक 265 मध्ये ए-विंग 304 क्रमांकाची सदनिका मिळाली. कागदपत्र पडताळणीनंतर म्हाडाने चव्हाण यांना विकसकाकडे रक्कम भरण्यास सांगितले. मात्र, जाहिरातीमध्ये दर्शविण्यात आलेल्या मूळ किमतीशिवाय अधिकची 3 लाख 50 हजार रुपयांची रक्कम भरण्यास चव्हाण यांच्यासह अनेक लाभार्थ्यांनी विरोध केला. त्याबाबत म्हाडा प्राधिकरणाचे मत विचारात घेऊन तक्रारदाराला कळविण्यात येईल, असे लेखी उत्तरही देण्यात आले. 

मुंबईकरांनो काळजी घ्या! मलेरिया फोफावतोय, जुलै महिन्यात रुग्णांमध्ये दुपटीने वाढ...महापालिकेचे आवाहन

त्यानुसार मंडळाने मुख्य वास्तुशास्त्र व नियोजनकार यांना पत्र लिहिले, या पत्रात मंडळाने म्हाडा जाहिरातीमध्ये नमूद केलेली किंमत सदनिकेची मूळ विक्री किंमत असून लाभार्थ्यांना सोसायटी चार्जेस, एमएसईबी चार्ज, टॅक्स व नियमानुसार इतर अनुषंगिक खर्च मूळ किमती व्यतिरिक्त विकसकास अदा करावी लागेल. सदर बाब मंडळाने जाहिरातीमध्ये प्रकर्षाने नमूद करावी, याबाबत प्राधिकरणाकडे स्पष्टीकरण मागितले होते. तसेच सदनिकेची विक्री किंमत तयार करताना 20 टक्के अतिरिक्त रक्कम आकारण्यात येत असल्याने विकसकाने शासकीय अत्यावश्यक शुल्काव्यतिरिक्त कोणतीही रक्कम आकारणे अभिप्रेत नाही, असे कार्यालयाचे मत असल्याचे या पत्रात म्हटले होते.

ठाणेकर तयारी करा! उद्यापासून 'या' वेळेत सुरु होतील दुकानं, असे असतील नियम

या पत्रावर आजही मंडळाने चव्हाण यांना विकसकास अतिरिक्त रक्कम भरायची की नाही, याबाबत लेखी कळविले नाही. यानंतरही एका अधिकाऱ्याने चव्हाण यांना आठ दिवसात रक्कम न भरल्यास सोडतीमधील घर रद्द करण्यात येईल, असे पत्र पाठविले आहे. यामुळे माजी सैनिक हवालदिल झाले आहेत. विकसकाकडे ही रक्कम भरण्यास चव्हाण यांनी तयारी दर्शविली आहे. मात्र म्हाडा आणि विकसक या पेचात चव्हाण यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत न्याय मिळावा यासाठी चव्हाण यांनी गृहनिर्माण मंत्री यांना पत्र लिहिले आहे.

सामनाचा आजचा अग्रलेख 'आजोबा- नातवा' वर, शिवसेनेला वाटतंय...

म्हाडाच्या योजनेवर नागरिकांचा विश्वास आहे. हा विश्वास टिकून राहण्यासाठी आपण योग्य तो निर्णय घ्यावा.
- दिलीपराव चव्हाण, माजी सैनिक

म्हाडाने जाहिरातीमध्ये किमतीचा उल्लेख केलेला आहे. लाभार्थी आणि विकसकाने सामोपचाराने निर्णय घेऊन याबाबत तोडगा काढणे आवश्यक आहे. आम्ही सोडत काढतो त्याप्रमाणे लाभार्थ्यांना घराचा ताबा मिळावा, यासाठी आम्हीही प्रयत्न करतो.
- अशोक पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे मंडळ

---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ex-army officer facing many problems in getting mhada home