परीक्षा महाराष्ट्राची, केंद्र उत्तरप्रदेशात,अन्‌ चीनमध्येही!

राज्यातील आरोग्य सेवक भरतीसाठी एका परीक्षार्थीचे लेखी परीक्षा केंद्र उत्तरप्रदेशात, तर एकाच केंद्र चक्क चीनमधील वुहान प्रांतात देण्यात आले आहे.
परीक्षा महाराष्ट्राची, केंद्र उत्तरप्रदेशात,अन्‌ चीनमध्येही!
परीक्षा महाराष्ट्राची, केंद्र उत्तरप्रदेशात,अन्‌ चीनमध्येही!sakal

पुणे : राज्यातील आरोग्य सेवक भरतीसाठी एका परीक्षार्थीचे लेखी परीक्षा केंद्र उत्तरप्रदेशात, तर एकाच केंद्र चक्क चीनमधील वुहान प्रांतात देण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील गट ‘क’ आणि ‘ड’ पदभरतीसाठी शनिवारी (ता. २५) आणि रविवारी (ता. २६) लेखी परीक्षा घेण्यात येत आहे. तब्बल आठ लाख ६६ हजार या परीक्षार्थी असलेल्या या परीक्षेकडे राज्य सरकारने गांभीर्याने पाहिले आहे, असे तक्रारींवरून दिसत नाही.

दत्ता पातूरकर या उमेदवाराच्या प्रवेश पत्रावर चक्क उत्तरप्रदेशातील ‘नोएडाचे सेक्टर ५५’ मधील परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. विशाल ढवळे या विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर ४१४३१२ ४१३५१२ हा चीनच्या उहान प्रांतातील पिन कोड देण्यात आला आहे.

परीक्षा महाराष्ट्राची, केंद्र उत्तरप्रदेशात,अन्‌ चीनमध्येही!
पुणे : दुधाला प्रतिलिटर १ रुपया बोनस

दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या परीक्षेसाठी अजूनही अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र मिळाले नाही. ज्या विद्यार्थ्यांना मिळाले आहेत, त्यावर परीक्षा केंद्र आणि फोटोचा गोंधळ आहे. ‘सकाळ’ने यासंबंधीचे वृत्त दिल्यानंतर राज्यभरातून उमेदवारांनी संपर्क साधत, आपल्या अडचणी मांडत आहेत.

प्रवेशपत्र मिळाले पण त्यातून परीक्षा केंद्र आणि वेळेची कोणतीच स्पष्टता होत नाही. परीक्षा घेण्यासाठी राज्य सरकारने न्यासा नावाच्या खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. परीक्षा केंद्रांची नावेच चुकीची असताना उमेदवारांकडून गैरव्यवहार झाल्यास त्याला जबाबदार कोण राहणार, असा उमेदवारांचा सवाल आहे.

या संबंधी सरकारची बाजू समजून घेण्यासाठी आरोग्य विभागाच्या पुण्याच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना संपर्क केला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

मला आज प्रवेशपत्र मिळाले, पण मी ज्या चार जिल्ह्यात लिपिक पदासाठी अर्ज केला होता. ते सोडून लातूर हे परीक्षा केंद्र आले. एकाच दिवशी मी चार ठिकाणी परीक्षा देऊ शकत नाही. तसेच प्रवेशपत्रावर लेखी परीक्षेचे गुण सर्व जिल्ह्यांसाठी ग्राह्य धरणार की नाही, याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही.

- गणेश चौरे, परीक्षार्थी (नाव बदलले)

परीक्षा महाराष्ट्राची, केंद्र उत्तरप्रदेशात,अन्‌ चीनमध्येही!
हडपसर : नेहरू पार्क व साई विहार कॉलनीला लवकरच मिळणार मुबलक पाणी

माझ्या प्रवेश पत्रावर परीक्षा केंद्राचे पूर्ण नाव आहे, मात्र त्याचा पत्ताच नाही. जो पिन कोड दिला आहे, तो नागपूर मधील असून, परीक्षा केंद्र नक्की कसे शोधायचे हा माझ्यापुढील मोठा प्रश्न आहे.

- सागर जाधव (नाव बदलले)

काय आहेत समस्या?

  • प्रवेश पत्रातून वेगवेगळ्या पदांसाठीच्या लेखी परीक्षेची स्पष्टता नाही

  • पसंती क्रमांक सोडून भलतेच परीक्षा केंद्र

  • परीक्षा एकच, तरीही शुल्क वेगवेगळे का?

  • गट ‘ड’ साठीच्या अभ्यासक्रमाबद्दल अजूनही संभ्रम

गोंधळची व्याप्ती मोठी

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने २८ फेब्रुवारी २०२१ रोजी आरोग्य सेवक भरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला होता. परीक्षार्थी केंद्रावर पोचल्यानंतर केंद्र उघडण्यात आले. काही ठिकाणी एकाच बाकावर दोन विद्यार्थी बसविण्यात आले. औरंगाबाद, नगर, नाशिक, बीड येथील केंद्रावर गैरप्रकारसंबंधी चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्या आदेशानंतरच पुढील प्रक्रिया केली जाणार होती. मात्र, तसे काही न होता, उमेदवाराची गुणवत्ता यादी न लावता, थेट फोन करून कागदपत्रे पडताळणी केल्याचा आरोप एका परीक्षार्थीने केला. हा महाराष्ट्रातील व्यापम गैरव्यवहार असल्याचा आरोपही होत आहे.

तुम्हाला काय वाटते?

राज्यातील आरोग्य सेवेक भरती प्रक्रियेतील गोंधळाबाबत काय वाटते, यासंबंधी आपली प्रतिक्रिया आम्हाला व्हॉट्सॲपवर नावासह पाठवा. क्रमांक - ८४८४९७३६०२ 0४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com