वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनो, परीक्षेच्या तारखा झाल्या जाहीर!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 April 2020

विद्यापीठाने सत्र-२च्या उन्हाळी परीक्षेसाठी विनाविलंब शुल्कासह अर्ज करण्यासाठी ५ मे २०२० पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.

पुणे : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा 15 ते 22 जून या कालावधीत घेण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयातील वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या उन्हाळी सत्रासाठी एम.डी., एम.एस., डिप्लोमा, एम.एस्सी या अभ्यासक्रमांसाठी १२ मे २०२० पासून पुढे परीक्षा घेण्यात येणार असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. परंतु सद्य परिस्थिती लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या सूचनांप्रमाणे वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

- शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी : मुदतवाढीतही शून्य टक्के व्याजाचा लाभ मिळणार!

कोरोना विषाणूच्या  संसर्गास अटकाव करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून रूग्णसेवेसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची मदत होणार आहे. या अनुषंगाने मे महिन्यातील सत्र परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे.

- युरोपमधल्या 'या' देशात 24 तासांत जगातील सर्वाधिक कोरोनाबळी!

तसेच विद्यापीठाने सत्र-२च्या उन्हाळी परीक्षेसाठी विनाविलंब शुल्कासह अर्ज करण्यासाठी ५ मे २०२० पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. विलंब शुल्कसह ८ मे आणि अति विलंब शुल्कासह १२ मे पर्यंत विद्यार्थांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

- Fight with Corona : पुढील ४ आठवडे अत्यंत महत्त्वाचे; चिनी शास्त्रज्ञाचे मत

सुधारित वेळापत्रकानुसार अशी होईल परीक्षा : 
पेपर : तारीख
पेपर- १: १५ जून २०२०
पेपर-२ : १७ जून
पेपर-३ : १९ जून
पेपर-४ : २२ जून
(वेळ : सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : www.muhs.ac.in

- Coronavirus : तबलीगींच्या मौलानाने घेतला यू-टर्न; म्हणाला, 'मी स्वत: ...'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Examination of Medical Postgraduate Courses started from June 15