कोकाटेंच्या राजीनाम्याचा निर्णय तुम्हीच घ्या, खातं कुणाला द्यायचं सांगा; मुख्यमंत्री फडणवीसांनी अजितदादांना स्पष्टच विचारलं

Manikrao Kokate : क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना ३० वर्षे जुन्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने २ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावलीय. यामुळे कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात आलं आहे.
Fadnavis Leaves Kokate Resignation Decision to Ajit Pawar

Fadnavis Leaves Kokate Resignation Decision to Ajit Pawar

Esakal

Updated on

राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली शिक्षा जिल्हा न्यायालयाने् कायम ठेवली. त्यांना दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. आता यामुळे माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद धोक्यात आलं आहे. माणिकराव कोकाटे यांच्या अटकेचं वॉरंट जारी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तर मंत्री कोकाटे हे नॉटरिचेबल आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले आहेत. या भेटीत माणिकराव कोकाटे यांच्याबाबत चर्चा झाल्याचं समजतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com