सरकारच्या भूमिकेच्या निषेर्धात राज्यातील 'ही' दुकाने रविवारपर्यंत बंद राहणार

प्रवीण जाधव
Friday, 10 July 2020

महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईडस, सीड डीलर्स असोसिएशनच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला  आहे. 

सातारा : मान्यताप्राप्त कंपन्यांकडून सीलबंद आलेली बियाण्यांची विक्री करूनही ती न उगवल्यास विक्रेत्यांना जबाबदार धरून गुन्हे दाखल करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ कृषी माल विकणाऱ्या दुकानदारांनी आजपासून (ता. 10) तीन दिवस संप पुकारला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रेही सहभागी असल्यामुळे रविवारपर्यंत (ता. 12) जिल्ह्यातील कृषी साहित्य विक्री दुकाने बंद राहणार आहेत.

राजमातांचे वकीलपत्र मागे घे, अन्यथा संपवू : दाेघांची धमकी 
 
याबाबत दिलेल्या निवेदनानुसार, यंदाच्या खरीप हंगामामध्ये सोयबीन व इतर बियाणे पेरणीनंतर उगवत नसल्याच्या शेतकऱ्यांकडून तक्रारी आहेत. त्यावर विक्रेत्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. वास्तविक विक्रेत्यांकडून कृषी विभागाने मान्यता दिलेल्या कंपन्यांकडून सीलबंद स्थितीत खरेदी केलेल्या बियाण्यांची विक्री होते. त्यामुळे विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करणे चुकीचे आहे. त्यामुळे हा निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईडस, सीड डीलर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या 'या' गटास 'हे' पडले महागात
 

त्याचबरोबर विक्रेत्यांकडून तपासणीसाठी घेतलेल्या नमुण्यांची रक्कम कृषी विभागाने गेली 15 वर्षे दिलेली नाही. ती मिळावी. मुदत बाह्य कीटकनाशके संबंधित उत्पादकांनी ताब्यात घेऊन त्याची विल्हेवाट लावावी, याबाबत शासकीय आदेश निघावा, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहेत. त्यामुळे तीन दिवस राज्यांतील सर्व विक्री दुकाने बंद ठेऊन आंदोलन करण्यात येणार आहे.

संपादन - सिद्धार्थ लाटकर

पूरग्रस्त गावांतील महिलांना या सुविधा द्या : ऍड. वर्षा देशपांडे

160 कामगार आले रस्त्यावर ; शंभर टक्के पगाराची मागणी, पण कंपनी देेते एवढेच.... 

सावधान! लग्न समारंभास 'याच' नातेवाईकांनी उपस्थित रहा, अन्यथा...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fertilizers Shops Will Be Remain Closed Till Twelve July In Maharashtra