पोलिस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी
पोलिस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणीSakal

पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणी ५० तर लेखी १०० गुणांची! जाणून घ्या, परीक्षेचे स्वरूप

पोलिस भरतीची तयारी आता सुरु झाली असून बुधवारपासून (ता. ९) अर्ज भरायला सुरवात होणार आहे. पोलिस भरतीसाठी सर्वप्रथम ५० गुणांची शारीरिक (मैदानी) चाचणी होणार आहे. त्यानंतर १०० गुणांची लेखी परीक्षा होईल.

सोलापूर : पोलिस भरतीची तयारी आता सुरु झाली असून बुधवारपासून (ता. ९) अर्ज भरायला सुरवात होणार आहे. पोलिस भरतीसाठी सर्वप्रथम ५० गुणांची शारीरिक (मैदानी) चाचणी होणार आहे. त्यानंतर १०० गुणांची लेखी परीक्षा होईल.

चालक पोलिस शिपाई, राज्य राखीव पोलिस बल आणि पोलिस शिपाई अशा संवर्गातील एकूण जवळपास १६ हजार पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने भरती प्रक्रियेसाठी स्वतंत्र संकेतस्थळ सुरु केले असून त्यावर उमेदवारांना बुधवारपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. दरम्यान, पोलिस भरतीवेळी पहिल्यांदा लेखी चाचणी होत असल्याने ग्रामीण भागातील तरूणांना अपेक्षित संधी मिळत नव्हती. त्यामुळे पहिल्यांदा मैदानी तथा शारीरिक चाचणी घेण्याचा निर्णय झाला. शारीरिक चाचणीत तीन प्रकार असतील. लेखी चाचणी चार विषयांवर असणार आहे. पण, महिला व पुरुष उमेदवारांसाठी आणि चालक व पोलिस शिपाई या पदांसाठी वेगवेगळी पध्दती असणार आहे. मैदानी चाचणीत ४० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून एका पदासाठी मेरिटनुसार दहा जणांची लेखीसाठी निवड केली जाणार आहे. लेखी चाचणीत सर्वाधिक गुण घेतलेल्यांची निवड होणार आहे.

पदनिहाय परीक्षा पध्दती व गुण

(पोलिस शिपाई)

शारीरिक चाचणी : ५० गुण

पुरुष उमेदवार महिला उमेदवार गुण

  • १६०० मीटर धावणे ८०० मीटर धावणे २० गुण

  • १०० मीटर धावणे १०० मीटर धावणे १५ गुण

  • गोळाफेक गोळाफेक १५ गुण

-----------

(चालक पोलिस शिपाई)

शारीरिक चाचणी : ५० गुण

पुरुष उमेदवार महिला उमेदवार गुण

  • १६०० मीटर धावणे ८०० मीटर धावणे ३०

  • गोळाफेक गोळाफेक २०

--------

लेखी चाचणी : १०० गुण

  • अंकगणित

  • सामान्यज्ञान (चालू घडामोडी)

  • बुध्दिमत्ता चाचणी

  • मराठी व्याकरण

  • मोटार वाहन चालवणे व वाहतूक (चालक पदासाठीच फक्त)

चालक पदासाठी ‘ही’ चाचणी बंधनकारक

चालक पोलिस शिपाई पदासाठी शारीरिक व लेखी चाचणी झाल्यानंतर त्या उमेदवारांना ५० गुणांची कौशल्य चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. पदभरतीच्या गुणवत्ता यादीत हे गुण ग्राह्य धरले जात नाहीत. पण, हलके वाहन चालवणे व जीप प्रकारातील वाहने चालविण्यासाठी प्रत्येकी २५ गुणांची प्रात्यक्षिक चाचणी होईल. त्यात उत्तीर्ण होणे चालक पोलिस शिपाई पदाच्या उमेदवारांना बंधनकारक असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com