मोठी बातमी - अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय अखेर उत्तीर्ण...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 June 2020

अखेर गेले दीड महिना सुरु असलेला महाराष्ट्रातील अंतिम वर्षाच्या परिक्षांचा वाद अखेर संपला आहे.

मुंबई : अखेर गेले दीड महिना सुरु असलेला महाराष्ट्रातील अंतिम वर्षाच्या परिक्षांचा वाद अखेर संपला आहे. या सर्व परिक्षा रद्द करण्याचा निर्णय करण्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे आणि तो राज्यपालांच्या आदेशानुसार तसेच नावाने आहे. दरम्यान, अंतिम वर्षातील प्रत्येक विद्यार्थ्यास परिक्षा न देता प्रमाणपत्र आपल्याला हवे असे लेखी देण्यास सांगितले आहे. हा निर्णय व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीही लागू असेल.

अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्यावरुन गेले दीड महिने वाद होत असताना विरोधी पक्षाने परिक्षा घेण्यासाठी कमालीचा आग्रह धरला होता. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुनश्च हरिओम घोषणा करतानाच अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द केल्याचे सांगितले होते. मात्र दोनच दिवसात राज्यपालांनी अंतिम वर्षाच्या परिक्षेचा निर्णय विद्यापीठ कायद्यानुसार घेणे आवश्यक आहे, याची आठवण करुन देताना परिक्षा रद्द करण्याच्या निर्णयास आपला विरोध असल्याचे सांगितले होते. त्यानंतर या परिक्षेबाबत उलट सुलट चर्चा सुरु होती.

मोठी बातमीक्रेडिट कार्डच्या विळख्यात अडकले आहात ? अशी करा क्रेडिट कार्डच्या विख्यातून स्वतःची सुटका...

अंतिम वर्षाच्या परिक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना यापूर्वीच्या परिक्षातील गुणांचे सरासरी गुण देण्याचा प्रस्ताव उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मांडला होता. त्यावरुनही टीका झाली होती. भारतीय जनता पक्षाने त्यास विरोध केल्यावर संघर्ष राजकीय संघर्ष सुरु झाला होता. अखेर आता आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत ही परिक्षा रद्द करण्याचे ठरवण्यात आले आहे. 

मागील सर्व सत्रात उत्तीर्ण झालेल्या अंतिम सत्रातील ज्या विद्यार्ध्यांना परिक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे असेल, त्यांच्याकडून तसे लिहून घेण्यात येईल आणि योग्य ते सूत्र वापरुन निकाल घोषित करण्यात येईल. परिक्षा देण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांची परिक्षा होईल. मात्र त्याबाबतचा निर्णय कोरोनाचा स्थानिक पातळीवरील प्रादूर्भाव पाहून जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने तारखा ठरवण्यात येईल. एटीकेटीबाबतचा निर्णय काही दिवसात होणार आहे.

मोठी बातमी - मुंबईकरांनो SBI बँकेसंबंधातील ही अत्यंत महत्त्वाची बातमी आधी वाचा, कारण २१ तारखेला....

अभियांत्रिकी, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, व्यवस्थापनशास्त्र, वास्तुकला, प्लॅनिग, संगणकशास्त्र, विधी, शारीरीक शिक्षण, अध्यापन शास्त्र या व्यावसायिकी अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्राच्या परिक्षाही रद्द करण्याचे ठरले आहे. त्यास मान्यता देण्याची विनंती संबंधित व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिखर संस्थेस करण्यात येणार आहे.

finally last year exams are cancelled in maharashtra state government issued GR


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: finally last year exams are cancelled in maharashtra state government issued GR