Sat, Sept 30, 2023

Video: ऑटो रिक्षाच्या मागच्या सीटवर आढळला पाच फुटांचा अजगर
Published on : 22 July 2022, 6:46 am
सध्या सोशल मीडियावर अंगावर काटा आणणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका ऑटो रिक्षाच्या मागच्या सीटवर चक्क पाच फुटांचा अजगर आढळून आल्याचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील टिटवाळा परिसरातील आहे.
ऑटोमध्ये असलेल्या या अजगराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ऑटोमध्ये अचानक अजगर बघितल्या नंतर ऑटो चालकही चांगलाच घाबरला. त्यानंतर सर्पमित्राच्या मदतीने या अजगराला बाहेर काढण्यात आले.
सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओची बरीच चर्चा रंगली आहे. नेटकरीही या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहे. सध्या पावसाळ्याच्या काळात अनेकजण फिरायला आणि निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडतात. अशावेळी ऑटो, बसमध्ये इतर कोणत्याही ठिकाणी वावरताना सावध राहणे, गरजेचे आहे.