

लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीकडे हळूहळू रवाना होत आहे. सकाळच्या सुमारास लालबागच्या राजाचे विसर्जन होईल. दरम्यान यासाठी गणेशभक्तांचा जनसागर विसर्जनासाठी लोटला आहे.
मुंबई अग्निशामक दल येथे रात्री उशिरा लालबागच्या राजाचं आगमन झाले. यावेळी अग्निशामक दलाच्या जवानांनी सायरन वाजवून लालबागच्या राजाला सलामी दिली.
पनवेल : पनवेलमध्ये विसर्जना दरम्यान 11 जणांना विजेचा शॉक लागला आहे. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णायलात दाखल करण्यात आले. पनवेल मधील वडघर गावात विसर्जनादरम्यान हा प्रकार घडला. पनवेल शहर पोलिस ठाणे हद्दीत उरण नाका येथील वडघर खाडी किनारी विसर्जन सुरु असताना ही दुर्घटना घडली आहे.
दुसरी घटना
गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान ठाण्यात मंडपावर झाड कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीतील ही दुसरी घटना आहे.
समाधान चौकात गर्दी अनियंत्रित झाल्याने पोलिसानी अनोखी शक्कल लढवली. लोकांना शांत करण्यासाठी पोलिसांनी चक्क राष्ट्रगीत लावलं. राष्ट्रगीत लागताच लोक स्तब्ध उभे राहिले.
मुख्यमंत्री निवासस्थानातील गणपती बाप्पांचे विसर्जन केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यंद्याच्या यंदाच्या गणेशोत्सवात लाखो लोक या उत्सवात सहभागी आहेत, गणेशउत्सवामुळे सर्वच उद्योगांना फायदा झाला असून कोरोनामुळे निर्बंध होते, आता वातावरण बदलेलं पाहायला मिळात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
प्रभादेवीमध्ये शिवसेना अन् शिंदे गट आमनेसामने आल्याचा घटनेवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले मी माहिती घेतली आहे, पोलिसांनी त्या प्रकरणाची काळजी घेतली आहे. कोणतीही घोषणाबाजी आणि वाद होऊ नये म्हणून पोलिसांनी दक्षता घेत पोलिसांनी आवश्यक उपयायोजना केल्या, तसेच सगळ्यांकडून माईक काढून घेतले होते.
प्रभादेवी परिसरात शिवसेना आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आले आमने-सामने
संजय भगत आणि समाधान सरवणकर यांचे कार्यकर्ते हे समोरासमोर
शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी घोषणा देताना डीवचल्याने वातावरण तापल्याचा आरोप
वातावरण तापल्याने पोलिसांनी मध्यस्थी करू
मुख्यमंत्री निवासस्थानातील गणपती बाप्पांचे विसर्जन केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यंदाच्या गणेशोत्सवात लाखो लोक या उत्सवात सहभागी आहेत, गणेशउत्सवामुळे सर्वच उद्योगांना फायदा झाला असून कोरोनामुळे निर्बंध होते, आता वातावरण बदलेलं पाहायला मिळात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
प्रभादेवीमध्ये शिवसेना अन् शिंदे गट आमनेसामने आल्याचा घटनेवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले मी माहिती घेतली आहे, पोलिसांनी त्या प्रकरणाची काळजी घेतली आहे. कोणतीही घोषणाबाजी आणि वाद होऊ नये म्हणून पोलिसांनी दक्षता घेत पोलिसांनी आवश्यक उपयायोजना केल्या, तसेच सगळ्यांकडून माईक काढून घेतले होते.
गणेशउत्सवात दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. ठाण्यातील कोलबाड येथील मित्रमंडळ या सार्वजनिक गणपती मंडळाच्या मंडपावर आणि दोन गाड्यांवर झाड पडल्याची घटना घडली. या घटनेच ४ जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवस्थानी बसवण्यात आलेल्या गणपतीचे विसर्जन मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थित पार पडला.
लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत लाखोच्या संख्येने भाविक सामील झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गिरगाव चौपाटीवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. खटाव मिल परिसरात लालबाग राजाची मिरवणूक पोहोचली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील आगामी काळात होणार सर्व सणउत्सव धमधडक्यात साजरा होईल, असं म्हटलं आहे. मागील दोन वर्षांतील स्थिती आपण पाहिली आहे. मात्र आता नवीन सरकार आलं असून यापुढे सगळे सण जल्लोषात साजरे करण्यात येणार असल्याचं शिंदे यांनी म्हटलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी देखील उपस्थित होते.
गिरगाव चौपाटी येथे गणेश विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी विसर्जनाच्या वेळी मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. तरी भाविकांचा उत्साह दिसून येत आहे. गिरगावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गणेश मंडळांवर पुष्पवृष्टी केली.
मुंबईतील गिरगाव चौपाटी समुद्रकिनारी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली आहे.
मुंबईतील जुहू बीचवर थायलंडमधील लोक गणपतीच्या मूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्यापूर्वी पूजा करत आहेत.
इतर सुरक्षा दलांसह सर्व जवान काल रात्रीपासून तैनात आहेत. मुंबई शहर वर्षानुवर्षे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे, परंतु गेल्या काही वर्षांत आम्ही कडक तयारी केली आहे. आम्ही सतर्क आहोत, लोकांनी काळजी करू नये, असं मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी म्हटलं.
प्रगती सेवा मंडळाचा तेजुकायाचा राजा चौपाटीवर दाखल झाला आहे. गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ माझगावातील अंजिरवाडीच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले. भुजबळ हे अखिल अंजिरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आहेत. भुजबळांनी सहकुटुंब या विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदवला. यावेळी समीर भुजबळ, पंकज भुजबळही उपस्थित होते. कोरोना संकट काही प्रमाणात कमी झाल्यामुळे सर्व कार्यकर्ते आणि भाविक भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याच्या भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरच्या गणरायाला निरोप दिला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना शांततेत गणेश विसर्जन साजरा करा असे आवाहन केले आहे. कोरोनामुळे पहिल्यांदा इतक्या मोठ्याने गणेशोत्सव साजरा होत आहे. निर्माल्यांमुळे प्रदुषण कसे कमी होईल याचे नियोजन करण्यात येईल. सगळ्यांनी सुरक्षीत रहा, सगळ्यांनी पर्यावरणपुरक रहा. भांडण तंटे न करता श्री गणेशाच विसर्जन करा. असे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांना केले.
भाजपा नेते व आमदार प्रविण दरेकर प्रमुख मार्गदर्शक असलेल्या दहिसर, ओवरीपाडा येथील सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार मनिषा चौधरी, आमदार अतुल भातखळकर, आयोजक प्रकाश दरेकर, जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, मंडळाचे सचिव सम्राट कदम, दिलीप राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात दाखल झाले आहेत. यावेळी यावेळी त्यांच्या हस्ते नवरात्र उत्सवाच्या मंडपाचे भूमिपूजन करण्यात आलं.
विशेष म्हणजे या सोहळ्यादरम्यान, राजन विचारे हे देखील उपस्थित होते. मात्र, दोघाच्याता शीत युद्दा पाहायला मिळालं. दोघांनी एकमेकांकडे पाहणंदेखील टाळलं. तसेच या कार्यक्रमला केदार दिघेदेखील उपस्थित होते.
गणपती बाप्पा मोरया ...पुढच्या वर्षी लवकर याऽऽऽ..अनंत चतुर्दशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अशा आशयाची पोस्ट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केली आहे
छगन भुजबळ माजगाव मध्ये दाखल झाले असून आता ते अंजीरवाडी मधील गणपती मंदिरामध्ये गेलेले आहेत गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेऊन ते अंजीरवाडी सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहेत
आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ वरळी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी स्वस्त दरात पोलिसांना घर देण्याची घोषणा केली.
चिंचपोकळी च्या चिंतामणी ची नुकतीच आरती संपलेली असून आता थोड्याच वेळात विसर्जनासाठी मार्गस्थ होईल.
असा असणार विसर्जन मार्ग
चिंतामणी मंडप - दत्ताराम लाड मार्ग - बाबासाहेब आंबेडकर मार्ग - लालबाग सिग्नल ला डाव्या बाजूने चिंचपोकळी पूलावरून बकरी अड्डा भायखळा मार्गे मार्गस्थ होईल.
बोरीवली पूर्व इथल्या मागाठाणे परिसरात विराजमान झालेल्या 'उपनगरचा राजा' ची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना भक्त आणि कार्यकर्ते भावूक झालेले पाहायला मिळतायत.
राज्यपाल भगतसिंह कोशारी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गणपतीच्या दर्शनासाठी सागर या शासकीय बंगल्यावर पोहोचले आहेत.
अमित ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार १३ समुद्र किनाऱ्यांवर उद्या शनिवार दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते १० दरम्यान 'आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी' ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
मुंबई : आज लाडक्या गणरायाचा विसर्जन सोहळा पार पडेल. गेल्या दहा दिवसांपासून असंख्य गणेशभक्तांनी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती. अखेरच्या दिवशीदेखील लालबागचा राजाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी उसळते. दरम्यान, सकाळपासूनच लालबागच्या राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांची विसर्जनासाठीची लगबग पाहायला मिळालीय.
सकाळपासून साडे पंधरा हजार पोलीस आणि SRPF च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. एसअरपीएफ आणि रॅपिड अॅक्शन फोर्सच्या टीम तैनात असतील त्यासोबतच फोर्स वनची विशेष टीम सुद्धा तैनात असणार आहेत. 600 पोलीस महिला अधिकारी कर्मचारी हे साध्या वेशात मुंबईच्या महत्त्वाच्या विसर्जन स्थळाच्या ठिकाणी तैनात असणार आहेत.
मुंबईतील 77 महत्त्वाचे विसर्जन स्थळ आणि कृत्रिम तलाव येथे विशेष पोलीस बंदोबस्त तैनात आहेत. लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी विशेष बंदोबस्त असेल. यामध्ये सह पोलीस आयुक्तांच्यासोबत अडीच हजार पोलीस तैनात आहेत. होमगार्डशिवाय स्वयंसेवी संस्था, एनसीसी विद्यार्थीसुद्धा पोलिसांसोबत वाहतूक हाताळण्यास विसर्जनवेळी मदतीसाठी आहेत.
आज विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामध्ये भाजीपाला, दूध, ब्रेड आणि बेकरी पदार्थ वाहून नेणारी वाहने, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, पेट्रोल, डिझेल, केरोसीन टँकर्स तसेच रुग्णवाहिका, शासकीय आणि निमशासकीय वाहने, स्कूल बस यांना सूट देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.