हरिभाऊ बागडे यांचे जयंत पाटील यांना 'छाती ठोक' प्रत्युत्तर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

या नंतर सर्व नेत्यांनी भाषणे करत नानाभाऊ यांना शिभेच्छा दिल्या. याच वेळी मंत्री जयंत पाटील यांनी शुभेच्छा देताना भाजपला चिमटे काढले. यावरून विधानसभेचे माजी अध्क्षय हरिभाऊ बागडे यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.   

औरंगाबाद  : आज विधानसभा अधिवेशनाचा दुसरा दिवस सुरु आहे. आज सुरुवातीलाच विधानसभा अध्यक्ष निवड झाली. नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झली. पुरेसे पाठबळ नसल्याने भाजप उमेदवाराने माघार घेतली. यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली.

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे एप डाऊनलोड करा

दरम्यान, या नंतर सर्व नेत्यांनी भाषणे करत नानाभाऊ यांना शिभेच्छा दिल्या. याच वेळी मंत्री जयंत पाटील यांनी शुभेच्छा देताना भाजपला चिमटे काढले. यावरून विधानसभेचे माजी अध्क्षय हरिभाऊ बागडे यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.   

विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे उर्फ नाना यांच्या डाव्या कानाने कमी ऐकू येण्याच्या त्रुटीबद्दल राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील यांनी आज सभागृहात टीका केली. बागडे नानांना डाव्या बाजूचे कमी ऐकू येत असल्यामुळे विरोधकांवर अन्याय झाला, नव्या अध्यक्षांनी जरा सभागृहाच्या दोन्ही बाजुंचे ऐकून सर्वांना न्याय द्यावा; अशा भावना व्यक्त केल्या. यावर हरिभाऊ बागडे यांनी; मला डाव्या कानाने कमी ऐकू येत, ही इंदिरा गांधीनी लादलेल्या आणीबाणीची देण आहे, तरी ऐकू येण्याचे मशीन लावून, मी सभागृहात सगळ्यांना न्यायच दिला; अशा शब्दांत जयंत पाटलांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. 

भाजपची माघार; नाना पटोले विधानसभेचे बिनविरोध अध्यक्ष!

विधासनसभा अध्यक्षपदी कॉंग्रसेचे नाना पटोले यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर पटोले यांचे अभिनंदन करण्यासाठी सर्वपक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी पटोले यांचे अभिनंदन करतांनाच माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या कार्यकाळात विरोधकांवर अन्याय झाल्याचे सांगितले. हे सांगत असतांना बागडे यांना डाव्या कानाने ऐकू येत नाही याचा उल्लेख करत जयंत पाटलांनी नव्या अध्यक्षांकडून अन्याय होऊ नये असे मत व्यक्त केले. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे एप डाऊनलोड करा

बागडे यांच्या काळात डाव्या बाजूला बसलेल्या विरोधकांकडे त्यांचे दुर्लक्ष झाले या विधानवर बागडे चांगलेच संतापलेले पहायला मिळाले. आपल्या शारिरीक व्यंगाचा उल्लेख करत जयंत पाटलांनी केलेल्या टिकेला बागडे यांनी सभागृहात जशास तसे उत्तर दिले. 

बागडे म्हणाले, विधानसभा अध्यक्ष म्हणून माझ्या कार्यकाळात मी सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंना योग्य संधी दिली. उलट सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांनाच त्यांचे मुद्दे मांडण्याला मी प्राधान्य दिले, कारण त्यामुळेच सरकार प्रभावीपणे काम करू शकते अशी माझी धारणा होती. मला डाव्या कानाने ऐकू येत नाही, यावरून जयंतरावांनी टिप्पणी केली, पण देशात जेव्हा इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली होती, तेव्हा जयंतराव कुठे गेले होते असा संतप्त सवाल बागडे यांनी केला. 

भाजपच्या सापळ्यातून सुटका; शिवसेैनिकांना बळ

आपल्याला डाव्या कानाने कमी ऐकू येतं हे जरी खरं असलं तरी त्याचा परिणाम सभागृहाच्या कामाकाजावर मी कधी होऊ दिला नाही. आणीबाणीच्या काळात केलेल्या आंदोलनात पोलिसांकडून झालेल्या मारहाणीत माझ्या डाव्या कानाच्या नसा फुटल्या होत्या, आणि तेव्हापासून मला डाव्या कानाने कमी ऐकू येत याची आठवण बागडे यांनी छाती ठोकून जयंत पाटलांसह सभागृहाला करून दिली. बागडे यांचा संताप आणि त्यांनी जयंत पाटलांच्या टिकेला दिलेल्या प्रत्युत्तराने सभागृहाचे वातावरण काही काळ गंभीर बनले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Haribhau bagade criticize Ncp leader jayant patil