आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती - राजेश टोपे

Rajesh Tope
Rajesh TopeGoogle file photo

मुंबई - राज्यात (Maharashtra) कोरोनाने हाहाकार माजवला असून आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. सध्या राज्यात दरदिवशी कोरोनाचे 50 हजारांच्या आसपास नवीन रुग्ण सापडत आहेत. एका बाजुला वैद्यकीय साधनांचा तुटवडा असताना आरोग्य कर्मचाऱ्यांचीही कमतरता भासत आहे. याच पार्श्वभूमीवर 100% रुग्ण सेवा पद भरण्याची काल मंत्री मंडळाची परवानगी मिळाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी (Rajesh Tope) दिली. यामुळे आता राज्यात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती करण्यात येणार आहे. यासाठीचा आदेश लवकरच जारी करण्यात येईल अशी माहिती राजेश रोपेंनी पत्रकार परिषदेत सांगितली.

Rajesh Tope
कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी महाराष्ट्र सज्ज

आरोग्य विभागात भरण्यात येणाऱ्या पदांमध्ये 12 हजार पदे ही क आणि ड वर्गातील असणार आहेत. तर 2 हजार मेडिकल ऑफिसर पदांचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय 2 हजार टेक्निकल पद भरणार असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितले आहे. आरोग्य विभागातील या भरतीसाठी मंत्री मंडळाची आवश्यकता नसेल असे राजेश टोपे म्हणाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांनाही पद भरण्याचे अधिकार देण्यात आल्याचं राजेश टोपे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com