
राज्यात शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा लागू करण्याच्या धोरणाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांचा एकत्र मोर्चा आयोजित करण्यात आलाय. मुंबईत ५ जुलै रोजी या मोर्चाचं आयोजन केलं असून ठाकरे बंधू या मोर्चात एकत्र दिसणार आहेत. २००६ मध्ये शिवसेनेतून बाहेर पडत मनसेची स्थापना केल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही बंधू एका मंचावर दिसतील. मात्र एका बाजूला मोर्चाची तयारी आणि ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असल्या तरी दुसरीकडे पोलिसांकडून मोर्चाला परवानगी मिळालेली नाही.