संजय राऊतांची कुंडली माझ्याकडे, वेळ आल्यावर बाहेर काढेन - नारायण राणे

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवरुन नारायण राणे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
Narayan Rane
Narayan Raneesakal
Updated on

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर सडकून टीका करताना त्यांची संपूर्ण कुंडली माझ्याकडे आहे, वेळ आल्यावर ती बाहेर काढेन असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिला आहे. शिवसेनेच्यावतीनं संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली होती, यामध्ये त्यांनी भाजपच्या अनेक नेत्यांना टार्गेट केलं होतं. या पत्रकार परिषदेला उत्तर म्हणून राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. (I will take out Sanjay Raut Kundali when time comes says Narayan Rane)

Narayan Rane
संजय राऊतांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीकडं - नारायण राणे

राणे म्हणाले, "संजय राऊत हे शिवसेनेचे नाहीत तर संपूर्ण राष्ट्रवादीचे आहेत. संजय राऊतांना राष्ट्रवादीकडून सुपारी मिळालीए की ठाकरेंना अटक झाल्यानंतर तुम्हालाच त्यांच्यापदावर बसवण्यात येईल. कारण सरकार स्थापनेवेळी जेव्हा उद्धव ठाकरे पहिल्यांदा शरद पवारांकडे रात्री भेटायला गेले त्यावेळी मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर होणार होतं. तेव्हा उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत आणि आदित्य ठाकरेचं होते. त्यावेळी ते नाहीतर मी असा व्यवहार झाला. तुमची कुंडली माझ्याकडे आहे. वेळ आल्यावर ती बाहेर काढली जाईल"

Narayan Rane
कोल्हेंवर आढळरावांचा पलटवार; "नाटकातली घोडी अनं नौटंकी थाट!"

देवेंद्र फडणवीसांवरही (Devendra Fadnavis) आरोप केलेत तर ते सिद्ध करुन दाखवा. तुमच्या मुख्यमंत्र्यांवरील बंद केलेल्या केसबद्दल तुमच्यापेक्षा मला जास्त माहिती आहे. पण मी अजून या प्रकरणावर बोललेलो नाही अद्याप गप्प बसलो आहे. आदित्य ठाकरेंसह सर्व व्यवहार मला माहिती आहेत पण आम्ही गप्प बसलोय. ईडीच्या अधिकाऱ्यांनी ३०० कोटी रुपये घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. यावर ईडीनं गप्प बसू नये त्यांना घेऊन जावं, असा हल्लाबोलही राणेंनी राऊतांवर केला.

Narayan Rane
"केजरीवाल म्हणाले, मी स्वतंत्र खलिस्तानचा पहिला पंतप्रधान होईल"

ईडीनं ३०० कोटी रुपये कोणाकडून घेतले हे सिद्ध करुन दाखवावं त्याशिवाय यांची तोंड बंद होणार नाहीत. या मंत्रिमंडळात किती लोक तुरुंगात गेले किती जाणार आहेत त्यावर संजय राऊत का बोलत नाहीत? पण पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करतात यांची लायकी आहे का? अशा शब्दांत नारायण राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com