esakal | IMD : कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

monsoon

IMD : कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पावसासाठी पोषक वातावरण असल्याने येत्या मंगळवारी (ता. 14) राज्यात सर्वदूर पाऊस पडेल असा अंदाज सोमवारी हवामान खात्याने वर्तविला. कोकणासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या मुसळधार सरी पडतील, असा इशाराही खात्याने दिला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे कायम असून, गुजरातच्या नालियापासून कमी दाब क्षेत्र, खांडवा, बालाघाट, रायपूर, संभाळपूर ते बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र (डीप डिप्रेशन) सक्रिय आहे. तर मॉन्सूनच्या आसाला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसापर्यंत ते कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे.

कमी दाबाच्या क्षेत्र निवळणार

बंगालच्या उपसागरातील ठळक कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून ओरिसाच्या किनारपट्टीलगत कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. ही प्रणाली जमिनीवर आली असून, ती ओरिसाच्या किनाऱ्यावरील चांदबलीपासून पश्चिमेकडे २० किलोमीटर अंतरावर होती. छत्तीसगड मध्य प्रदेशकडे सरकत असलेल्या या प्रणालीची तीव्रता कमी होत आहे. तर गुजरात आणि परिसरावरही आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे.

हेही वाचा: भारतानं पूर्ण केला 75 कोटी लसीकरणाचा टप्पा; WHOकडून कौतुक

राज्यात दोन दिवस पावसाचा जोर राहण्याची शक्यता असून, येत्या मंगळवारी (ता. १४) कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा, तसेच मराठवाडा, विदर्भात विजा, गडगडाटासह पावसाचा ‘येलो अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे.

मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)

कोकण : पालघर.

मध्य महाराष्ट्र : नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर.

हेही वाचा: पोटनिवडणुका पुढे ढकलण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न - वडेट्टीवार

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

कोकण : मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी.

मध्य महाराष्ट्र : धुळे, नंदूरबार.

मराठवाडा : जालना, परभणी, हिंगोली.

विदर्भ : अकोला, अमरावती.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

विदर्भ : वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा.

loading image
go to top