

Maharashtra Weather Update
ESakal
मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत चालला आहे. यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसत असून अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने अनेक भागांत ताशी ७० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याचे नोंदवले आहे. त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन 'रेड अलर्ट' जारी केला आहे. अशातच हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात अतिवृष्टीचा इशारा देत नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.