भारतही श्रीलंकेच्या वाटेवर...; बजेटवरून प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर हल्लाबोल Prakash Ambedkar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prakash Ambedkar and Narendra Modi

भारतही श्रीलंकेच्या वाटेवर...; बजेटवरून प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

पुणे - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारचं कौतुक केल होतं. तसेच विरोधी पक्षातील नेत्यांच्या होत असलेल्या चौकशांना योग्य म्हणत आंबेडकरांनी मोदींना पाठिंबा दर्शविला होता. मात्र आज त्यांनी बजेटवरून आणि देशातील महागाईवरून मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे. (Prakash Ambedkar news in Marathi)

आंबेडकर म्हणाले की, अर्थसंकल्पातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, केंद्र शासनाकडे कितीं पैसा येणार आहे. यामुळे आपल्यावर श्रीलंकासारखी परिस्थिती येणार आहे. आपल्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. १८ लाख कोटींचं आपण आयात करणार आहोत. यासाठीचे पैसे बँक, एलआयसी मधून येणार आहेत.

एका बाजूला अदानी सारखे शेयर पडत आहेत, त्याच्या विरोधात शासन काही बोलत नाही. दुसऱ्या बाजूला एलआयसी आणि बँकांमधून १८ लाख कोटी पैसा उचलला तर व्यापारासाठी पैसा राहणार का? याचा खुलासा केला पाहिजे, अशी मागणी आंबेडकर यांनी केली.

भाजपच्या वचननाम्यात मध्यम वर्गाचे इन्कम वाढवू असे सांगितले होते. शासन चीनकडून काहीच शिकले नाही, चीनने नागरिकांना 4 बोनस देऊ केले होते, पण उपयोग झाला नाही. आपल्याकडे इन्कम टॅक्सचा स्लॅब वाढवला. मात्र त्याचा काहीही उपयोग होणार नाही, यातून गरिबांना काहीही फायदा होणार नाही. हा असंतोष वाढवणारा बजेट आहे. तर काँग्रेसने बाळगलेलं मौन दुर्दैवी असल्याचं आंबेडकर म्हणाले.

दरम्यान मुंबई महापालिकेत आमचं आणि सेनेच बोलणं सुरु आहे. पुण्यातील पोटनिवडणुकीत शिवसेना लढणार असून आमचा त्यांना पाठिंबा असल्याचं आंबेडकर म्हणाले.