esakal | देशात मृतांच्या संख्येत मोठी वाढ, महाराष्ट्राची आकडेवारी कारणीभूत
sakal

बोलून बातमी शोधा

corona death toll

गेल्या 24 तासात देशात 3 हजार 998 मृत्यूची नोंद झाली. गेल्या 39 दिवसांमधील ही सर्वाधिक आकडेवारी आहे.

देशात मृतांच्या संख्येत मोठी वाढ, महाराष्ट्राची आकडेवारी कारणीभूत

sakal_logo
By
सूरज यादव

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मंगळवारी पुन्हा वाढ झाली. यामध्ये मृतांची संख्या अचानक जवळपास 4 हजार इतकी झाल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. मंगळवारी दिवसभरात भारतात 45 हजार 114 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. तर 36 हजार 857 जण कोरोनामुक्त झाले. गेल्या 24 तासात देशात 3 हजार 998 मृत्यूची नोंद झाली. गेल्या 39 दिवसांमधील ही सर्वाधिक आकडेवारी आहे. याआधी 11 जून रोजी देशात 3 हजार 996 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

देशात मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ होण्यामागे महाराष्ट्रातील आकडेवारी कारणीभूत ठरली आहे. महाराष्ट्रात जुन्या मृत्यूची नोंद पोर्टलवर अपडेट केल्यानं ही संख्या वाढली आहे.एखाद्या राज्याने जुनी आकडेवारी अपडेट करणं हे नवं नाही. याआधी बिहारने 9 जून रोजी मृतांची आकडेवारी अपडेट केली होती. तेव्हा देशात सर्वाधिक 6 हजार 139 रुग्ण सापडले होते.

हेही वाचा: महिलेला एकाच वेळी दोन व्हेरिएंटचा संसर्ग; देशातील पहिलाच रुग्ण

महाराष्ट्रात मंगळवारी 147 रुग्णांचा मृत्यू झाला तर 3 हजार 509 जुन्या मृत्यूची आकडेवारी अपडेट करण्यात आली. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10 जुलैपर्यंतची तर मृतांची संख्या 12 जुलैपर्यंतची अपडेट करण्यात आली आङे. अपडेट करताना काही कारणांनी नोंद न करता आलेली आकडेवारी मंगळवारी अद्ययावत करण्यात आली. त्यामध्ये 2479 पॉझिटिव्ह रुग्ण तर 3509 मृतांची संख्या अपडेट केली गेली.

हेही वाचा: कोरोनामुळे भारतात आतापर्यंत 50 लाख मृत्यू?

भारतासाठी दिलासा देणारी गोष्ट म्हणजे पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला आहे. सध्या दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा 2.27 टक्के इतका असून सलग 30 दिवसांपासून हा दर 3 टक्क्यांपेक्षा कमी आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण मोहिम सुरु असून आतापर्यंत देशातील 41 कोटी 54 लाख 72 हजार 455 जणांना लस देण्यात आली. तर 45 कोटी लोकांची कोरोना टेस्ट झाली आहे.

loading image