'हळद उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकावर'; युरोप, अमेरिकेतून सौंदर्य प्रसाधनेसाठी हळदीची मोठी मागणी

कोरोनानंतरच्या कालावधीत नैसर्गिक हळद (करक्युमिन) उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे.
Turmeric Production
Turmeric Productionesakal
Summary

चीनमध्ये निर्मित केलेल्या कृत्रिम हळदीला जागतिक बाजारपेठेत मागणीच झालेली नाही. चीनच्या हळदीवर कोणाचा विश्‍वासच राहिलेला नाही.

सांगली : कोरोनानंतरच्या कालावधीत नैसर्गिक हळद (करक्युमिन) उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. सांगलीतील हळद उत्पादन (Turmeric Production), खरेदी, निर्यातीमध्ये व्यापारी, अडते यांची भूमिका महत्त्वाची आहे. युरोप, अमेरिकेतून सौंदर्य प्रसाधने, औषधनिर्मितीसाठी हळदीतून निघणाऱ्या करक्युमिनला मोठी मागणी आहे. भविष्यात सेंद्रिय उत्पादनांना निर्यातीची संधी आणि अधिकची किंमत मिळेल, असे मत ‘एफआयएसएस’ अध्यक्ष अश्‍विन के. नायक (Ashwin K. Nayak) यांनी व्यक्त केले.

सांगलीतील ककुन हॉटेल येथे फेडरेशन ऑफ इंडियन स्पाईस स्टेकहोल्डरतर्फे (FISS) उंझा (गुजरात) सांगलीतील हळद व्यापारी, अडते व्यापाऱ्यांसाठी परिसंवाद झाला. केंद्र सरकारने हळद बोर्डाची नुकतीच स्थापना केली आहे. ही संस्था केंद्र सरकार, व्यापारी व शेतकरी यांच्यात दुवा म्हणून काम करणार आहे. हळद व्यापार वृद्धीसाठी सेमीनार उपयुक्त ठरेल, असा संयोजकांचा दावा आहे.

Turmeric Production
'मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं असेल, तर उदयनराजेंनाच साताऱ्यातून उमेदवारी द्या'; कोणी केलीये मागणी?

सांगलीतील चर्चासत्रास पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी हजेरी लावली. सांगलीतील हळद संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ, सांगली कृषी विभागाचे सहकृषी संचालक मनोजकुमार वेताळ उपस्थित होते. मसाल्याच्या पदार्थांसह सेंद्रिय उत्पादनांना सरकार महत्त्व देत आहे. अध्यक्ष नायक म्हणाले, ‘‘कोरोनानंतर देशातील हळद उत्पादनाला मोठे महत्त्व आले आहे. चीनमध्ये निर्मित केलेल्या कृत्रिम हळदीला जागतिक बाजारपेठेत मागणीच झालेली नाही.

Turmeric Production
Congress MLA : विजयाचा विश्वास नसल्यानेच भाजपने शिवसेना-राष्ट्रवादी फोडली; सतेज पाटलांची खरमरीत टीका

चीनच्या हळदीवर कोणाचा विश्‍वासच राहिलेला नाही. देशातील १०० किलो हळदीपासून ३-४ किलो करक्युमिन निघते. त्यांचा वापर सौंदर्य प्रसाधनांसाठी केला जातो. त्यामुळे देशात आणि सांगलीतील हळद व्यापारी, अडते, उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत या चर्चासत्रातून प्रश्‍न समजावून घेत आहोत. ही फक्त सुरवात आहे. यातून निघणारे मुद्दे आम्ही केंद्र सरकारपुढे ठेवून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

नव्याने झालेल्या कायद्यान्वये उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि अडत्यांसह यंत्रणेतील सर्व घटकांना शाश्‍वत शेतीतून समाधान केले जाईल, याची दक्षता घेतली जाणार आहे. त्यांच्या अंमलबजावणीसाठी आम्ही देशभर चर्चासत्रातून सूचना घेत आहे. सांगली हळद संघटनेचे अध्यक्ष कौशल शहा, सचिव हार्दिक सारडा, सतीश वामजा, चेंबरचे अध्यक्ष अमर देसाई, माजी अध्यक्ष शरद शहा, गोपाल मर्दा, सतीश पटेल आदींनी संयोजन केले.

Turmeric Production
रेल्वेमंत्र्यांसमोरच उदयनराजेंनी वाचला समस्‍यांचा पाढा; अश्विनी वैष्णव कोणता निर्णय घेणार? दोघांत महत्त्वपूर्ण चर्चा

‘एफआयएसएस’चे अश्‍विन नायक म्हणाले..

  • सेंद्रिय उत्पादनांना जादा किमतीने निर्यातीत संधी

  • संस्थेतर्फे शेतकऱ्यांचीही जागृती करणार

  • सांगलीत लवकरच सर्वेक्षण करणार

  • राज्यस्थानमध्ये सेंद्रिय उत्पादनात आघाडीवर

  • शेतकरी गटांना निर्यातीची संधी

  • देशातून १७ हजार कोटींची निर्यात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com