Satej Patil News : विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसचे जोरदार लॉबिंग, सतेज पाटलांच नाव आघाडीवर?

Satej Patil Congress
Satej Patil Congress

Congress News : महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन नुकतंच संपलं आहे. त्यानंतरही महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. काँग्रेसने विधान सभेच्या विरोधी पक्षनेतेपदानंतर आता विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदावर देखील दावा सांगितल्याची चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेसच्या 9 विधान परिषद (Vidhan Parishad) आमदारांपैकी सहा आमदारींनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे घेण्याची मागणी केली आहे. यामुळे महाविकास आघाडीत वाद होण्याची शक्यता देखी सूत्रांनी वर्तवली आहे. काँग्रेसकडे विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

Satej Patil Congress
Devendra Fadnavis: ''त्यांनी डोळ्याला पट्टी लावली आहे'' आदित्य ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर

महाराष्ट्रातील बदलेल्या राजकीय परिस्थितीनंतर महाविकास आघाडी मधील समिकरणे देखील बदलली आहे. नुकतेच काँग्रेसचे विजय वडेट्टीवार हे विधान सभेचे विरोधी पक्षनेते झाले. आता यानंतर काँग्रेसने विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदावर देखील दावा सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. (Maharashtra Politics)

सध्या ठाकरे गटाचे अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोध पक्षनेते आहेत. काँग्रेसच्या या नव्या मागणीनंतर आता ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीतून अजित पवार गट फुटल्यानंतर दोन्ही सभागृहातील संख्याबळाचे गणित बदलले.

Satej Patil Congress
Manipur Volliance : ३ जणांच्या हत्येनंतर अजूनच बिघडली मणिपूरची परिस्थिती, डोंगराळ भागातून होत आहे ड्रोनने हल्ला!

आता महाविकास आघाडीत काँग्रेसचे संख्याबळ वाढले आहे. त्यामुळेच काँग्रेसने विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदासाठी दावा ठोकला आहे. काँग्रेसकडून सतेज पाटील, अभिजीत वंजारी आणि राजेश राठोड या तीन विधान परिषदेच्या आमदारांची नावे विरोधीपक्षनेतेपदासाठी चर्चेत आहेत.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे विधान परिषदेतील संख्याबळ पाहिलं तर काँग्रेसकडे 9 आमदार आहेत. तर ठाकरे गटाकडे 8 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 4 आमदार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com