

Railway Ticket Price Hike
ESakal
नितीन बिनेकर
मुंबई : भारतीय रेल्वेच्या वीज खरेदीवर खासगी उद्योगांप्रमाणे वीज अधिभार भरावा लागेल, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला. त्यानुसार रेल्वेला मागील १० वर्षांतील थकबाकी, अधिभार आणि व्याज मिळून तब्बल १८ हजार कोटी रुपये भरावे लागण्याची शक्यता आहे. हा अतिरिक्त खर्च पर्यायाने प्रवाशांच्या तिकिटातून वसूल केला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी, इंधन दरवाढीमुळे आधीच महागाईने पिचलेल्या प्रवाशांसमोर रेल्वे तिकीट दरवाढीचे संकट उभे ठाकले आहे.