esakal | 'त्या' नोटीशीवर इंदुरीकर महाराजांनी खुलासा सादर केला, पण...
sakal

बोलून बातमी शोधा

Indurikar-Maharaj

आज दुपारी इंदुरीकर महाराजांचे वकील आणि एक सेवेकरी यांनी बंद लिफाफ्यासह जिल्हा रुग्णालयात आले होते.

'त्या' नोटीशीवर इंदुरीकर महाराजांनी खुलासा सादर केला, पण...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी निवृत्ती महाराज इंदुरीकर महाराज यांना जिल्हा शल्यचिकित्सक यांनी नोटीस पाठवली होती. त्या नोटिशीला खुलासा म्हणून इंदुरीकर महाराजांनी बुधवारी (ता.१९) बंद लिफाफ्यात आपला खुलासा सादर केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मिळालेल्या माहितीनुसार, कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनामध्ये महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. तसेच मूल जन्माबाबतही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पीसीपीएनडीटी कायद्यान्वये इंदुरीकर महाराज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती.

- शिवाजी महाराज जगातील सर्वश्रेष्ठ योद्धा : अमिताभ बच्चन

यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. प्रदीप मुरंबीकर यांनी 12 फेब्रुवारीला इंदुरीकर महाराजांना वादग्रस्त वक्तव्याबाबत खुलासा सादर करण्याबाबत नोटिस पाठवली होती. दरम्यान, आज दुपारी इंदुरीकर महाराजांचे वकील आणि एक सेवेकरी यांनी बंद लिफाफ्यासह जिल्हा रुग्णालयात आले होते. त्यावेळी अपघात विभागामध्ये कार्यरत असलेल्या डॉ. एस. जी. ढाकणे यांच्याकडे आपले म्हणणे सादर केले. मात्र, त्या लिफाफ्यामधील तपशील समजू शकला नाही. 

- धक्कादायक! जेवणाच्या ताटावरून जवानांना उठवले

इंदुरीकर महाराजांनी पाठवलेले खुलाशाचे पत्र हे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या नावाने पाठविले आहे. त्यामुळे ते पत्र आम्हाला वाचता करता येणार नाही.
- डॉ. एस.जी. ढाकणे

- हे महाराज झोपले काट्याकुट्यांवर, म्हणाले इंदुरीकर महाराजांचं बरोबर  

loading image