Devendra Fadnavis: कार्यकर्त्यांना प्रेरणा...; 'मी पुन्हा येईन'च्या ट्विटवर भाजपचं स्पष्टीकरण

महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन फडणवीसांचा 'मी पुन्हा येईन' हा व्हिडिओ ट्विट करण्यात आल्यानं खळबळ उडाली होती.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissakal

मुंबई : महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन फडणवीसांचा 'मी पुन्हा येईन' हा व्हिडिओ ट्विट करण्यात आल्यानं खळबळ उडाली होती. यामुळं माध्यमांतून सातत्यानं त्यावर चर्चा सुरु झाल्यानं त्यावर भाजपनं स्पष्टीकरण दिलं आहे. (Inspiration to activists BJP explanation on tweet of Devendra Fadnavis quote I will come again)

Devendra Fadnavis
Devendra fadanvis: फडणवीसांचा 'मी पुन्हा येणार'चा व्हिडिओ चर्चेत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...

...तर मला आनंदच!

भाजपचे आमदार प्रवीण दरेकर म्हणाले, "भाजपच्या प्रदेशानं किंवा केंद्रीय नेतृत्वाच्या मान्यतेनं हे ट्विट केलंय की नाही हे मला माहिती नाही. कार्यकर्ता म्हणून मला विचाराल तर मला आनंद वाटणं स्वाभाविक आहे. पण असा काही विषय आहे, असं मला वाटत नाही. कारण फडणवीसांनीच हे जाहीर केलं आहे की एकनाथ शिंदेंच्या नेृत्वाखाली आम्ही एकत्रितपणे काम करतो आहोत" (Latest Marathi News)

Devendra Fadnavis
Devendra Fadanvis: फडणवीसांचे 'मी पुन्हा येईन'; भाजपच्या ट्विटमुळे राजकीय भूकंपाचे संकेत?

तर पक्षाची भूमिका

या ठिकाणी मी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते पालघर दौऱ्यावर आहेत त्यामुळं त्यांच्या फोनला रेंज नाही. पण त्यांचा जर होकार या ट्विटसाठी असेल तर निश्चितपणे पक्षाची भूमिका होईल, असंही दरेकर यांनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

Devendra Fadnavis
Yuva Sangharsh Yatra: मराठा तरुणांच्या आत्महत्या अन् 'युवा संघर्ष यात्रा' स्थगित, रोहित पवारांची घोषणा

कार्यकर्त्यांना प्रेरणा

दरम्यान, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या ट्विटवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी अशा प्रकारे ट्विट केले जातात. मला वाटतं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये एकत्र समन्वय आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी तिघेही एकत्रितपणे काम करत आहेत"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com