Yuva Sangharsh Yatra: मराठा तरुणांच्या आत्महत्या अन् 'युवा संघर्ष यात्रा' स्थगित, रोहित पवारांची घोषणा

रोहित पवार यांनी यात्रा स्थगित करण्यामागचं कारणंही स्पष्ट केलं आहे.
Rohit Pawar
Rohit Pawar

मुंबई : महाराष्ट्रातील तरुणांच्या, नागरिकांच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं युवा संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेतला होता. आज या यात्रेचा चौथा दिवस होता. आमदार रोहित पवार हे या यात्रेचं नेतृत्व करत होते. पण अचानक ही यात्रा रद्द करण्यात येत असल्याची घोषणा रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. (NCP Yuva Sangharsh Yatra suspended Rohit Pawar announces)

सरकार गंभीर नाही

रोहित पवार म्हणाले, युवा संघर्ष यात्रा ज्यासाठी काढण्यात आली. त्यातील मुद्दे ४५ दिवसांत यात्रेदरम्यान सरकारकडून निकाली लागतील अशी आमची अपेक्षा होती. पण आजची राज्यातील परिस्थिती बघितली तर ज्यांच्यासाठी आम्ही लढत आहोत ते आत्महत्या करताना दिसत आहेत. यावर सरकारकडून कुठलीही ठोस पावलं उचलली जात नाहीएत.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री दिल्लीला गेले होते तिथं पंतप्रधनांशी सकारात्मक चर्चा होऊन तोडगा निघेल असं वाटतं होतं. पण पंतप्रधानांनी काल शिर्डीत बोलताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काहीही भूमिका स्पष्ट केली नाही. (Latest Marathi News)

Rohit Pawar
Ajit Pawar Vs Sharad Pawar: अजितदादांना शरद पवारांचा शह! दोन विद्यमान आमदारांचे विरोधक गळाला

जरांगेंची प्रकृती खालावली

मराठा आरक्षणासाठी जेव्हा मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला तेव्हा आपणही त्यांना पाठिंबा द्यावा यासाठी आम्ही दुसऱ्या दिवशी यात्रेत चालत असताना अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला. याचा काहीतरी परिणाम होईल आणि सरकार निर्णय घेईल असं वाटतं होतं. पण तसं काही झालं नाही. दुसरीकडं जरांगे यांची प्रकृती खालवत आहे. यापार्श्वभूमीवर आजचा सकाळचा टप्पा संपल्यानंतर तिथेच आम्ही थांबलो. (Marathi Tajya Batmya)

Rohit Pawar
Israel-Hamas War: हेरगिरी करणारं 'पेगासिस' आता इस्राइलला करणार मदत! हमासला नमवण्याची तयारी सुरु

वातावरण चिघळू नये ही भूमिका

छत्रपती संभाजीनगरमधून आलेले सर्व पदाधिकारी माझ्याकडं येऊन एक पत्र दिलं त्यात त्यांनी सर्व सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका व्यक्त केली. तसेच आम्हाला विनंती केली की, आज महाराष्ट्रात तरुणांच्या आत्महत्यांची परिस्थिती निर्माण झाली आहे, ती थांबवण्यासाठी राज्यात शांततेची गरज आहे. हे वातावरण आणखी वेगळ्या दिशेनं जाऊ नये, म्हणून आम्ही सर्वानुमते निर्णय घेत आहोत की, ही युवा संघर्ष यात्रा आपण काही काळ स्थगित करत आहोत.

Rohit Pawar
भारताच्या 'त्या' नौदल अधिकाऱ्यांच्या फाशीच्या शिक्षेमागे इस्राइल कनेक्शन?

पुन्हा यात्रा कधी सुरु होणार?

जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा ही यात्रा पुढे नेण्यात येईल, त्याची सविस्तर माहिती कळवण्यात येईल. महाराष्ट्रातील जनतेला कुठलीही अडचण येऊ नये तसेच जे सध्या संघर्ष करत आहेत त्यांच्या पाठिशी राहू, असही यावेळी रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com