झेडपीच्या शिक्षकांच्या ९ जूननंतर आंतरजिल्हा बदल्या

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया यंदा प्रथमच ऑनलाइन राबविली जाणार आहे. त्यासाठी तयार केलेले पोर्टल पूर्ण तयार झाले असून बदल्यांची प्रक्रिया आता ९ जूनपासून सुरू होणार आहे. १० टक्क्यांपेक्षा अधिक रिक्तपदे असलेल्या जिल्हा परिषदांनाही या बदली प्रक्रियेत सहभाग घेता येणार आहे.
झेडपीच्या शिक्षकांच्या ९ जूननंतर आंतरजिल्हा बदल्या
SAKAL
Updated on

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९७ शाळांमधील पाचवी ते आठवीपर्यंतच्या जवळपास दीड लाख विद्यार्थ्यांना अवघे ५० शिक्षक विज्ञान विषय शिकवितात, अशी वस्तुस्थिती समोर आली आहे. झेडपी शाळांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत अनेक पालकांनी त्यांची मुले दुसरीकडे खासगी शाळांमध्ये विशेषत: इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घातली आहेत. तरीदेखील, विज्ञान शिक्षक भरले गेले नाहीत, हे विशेष. दरम्यान, ९ जूननंतर ग्रामविकास विभागातर्फे ९ जूननंतर शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या होणार आहेत.

झेडपीच्या शिक्षकांच्या ९ जूननंतर आंतरजिल्हा बदल्या
दारू गाळणाऱ्या हातांनी बनविला ‘बंजारा’ ब्रॅण्ड! हातभट्टी दारूमुक्तीकडे सोलापूरची वाटचाल

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या वाढावी, यादृष्टीने मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, शिक्षणाधिकारी किरण लोहार हे सातत्याने प्रयत्न करीत आहेत. पण, कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पण, दहावीनंतर विज्ञान विषयातून पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा पाया मजबूत व्हावा म्हणून विज्ञान विषयाला स्वतंत्र शिक्षक असणे आवश्यक आहे. त्यासाठी पदे मंजूर असतानाही समाजशास्त्र विषय शिकविणाऱ्या उपशिक्षकांना त्याची जबाबदारी देण्यात आली. उपशिक्षक म्हणून नोकरी मिळाल्यानंतर बीएस्सी झालेल्यांची संख्या अत्यल्प असल्याने त्यावर अद्याप निर्णय घेतला गेला नाही. पण, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या वाढावी, यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी आता ती रिक्तपदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. पण, समाजशास्त्राचा नकार घेऊन विज्ञान शिक्षक म्हणून नियुक्ती मागणाऱ्या शिक्षकांपैकी कितीजण त्याला होकार देतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपशिक्षक पदावरून विज्ञानाच्या माध्यमातून त्या शिक्षकांना पदोन्नती मिळणार आहे. मात्र, त्यांना आगामी तीन ते पाच वर्षांत त्या विषयातून पदवी घ्यावीच लागणार आहे. अन्यथा, त्यांना पदोन्नती व त्यानुसार वेतनश्रेणीही मिळणार नाही.

झेडपीच्या शिक्षकांच्या ९ जूननंतर आंतरजिल्हा बदल्या
ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय! १० गुंठ्यांपर्यंत जमीन खरेदी-विक्रीला परवानगी

झेडपी शाळांची स्थिती...

  • एकूण शाळा

  • २७९७

  • विद्यार्थी संख्या

  • २.०२ लाख

  • एकूण शिक्षक

  • ९,२८७

  • विज्ञान शिक्षक मंजूर

  • ७३७

  • विज्ञानाचे शिक्षक कमी

  • ६८७

झेडपीच्या शिक्षकांच्या ९ जूननंतर आंतरजिल्हा बदल्या
महापालिका निवडणुकीसाठी महाआघाडीचा ४०: ४० :३३ फॉर्म्युला

९ जूननंतर विज्ञान शिक्षकांची नियुक्ती

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये काही वर्षांपासून विज्ञानाची ६८७ पदे रिक्त आहेत. पण, आता ९ जूननंतर बारावी विज्ञान विषयातून उत्तीर्ण झालेल्या साडेबाराशे उपशिक्षकांना समुपदेशनातून त्या ठिकाणी संधी दिली जाणार आहे.

- किरण लोहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

झेडपीच्या शिक्षकांच्या ९ जूननंतर आंतरजिल्हा बदल्या
८५ टक्के रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत! लसीकरणामुळे मृत्यूदर घटला; ७.२५ कोटी व्यक्ती सुरक्षित

शिक्षकांच्या उद्यापासून आंतरजिल्हा बदल्या

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया यंदा प्रथमच ऑनलाइन राबविली जाणार आहे. त्यासाठी तयार केलेले पोर्टल पूर्ण तयार झाले असून बदल्यांची प्रक्रिया आता ९ जूनपासून सुरू होणार आहे. १० टक्क्यांपेक्षा अधिक रिक्तपदे असलेल्या जिल्हा परिषदांनाही या बदली प्रक्रियेत सहभाग घेता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com