Jitendra Awhad: विरोधीपक्ष नेतेपदी आव्हाडांची नेमणूक वैध की अवैध? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

जयंत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांची विरोधीपक्ष नेतेपदी आणि प्रतोतपदी नियुक्ती केली आहे.
Ajit Pawar taunt Jitendra Awhad On the habit of getting up early in the morning at Pune
Ajit Pawar taunt Jitendra Awhad On the habit of getting up early in the morning at Pune
Updated on

मुंबई : अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांची विरोधीपक्ष नेतेपदी आणि प्रतोतपदी तातडीनं नियुक्ती केली होती. पण आव्हाडांची विरोधीपक्ष नेते म्हणून नियुक्ती वैध की अवैध? याबाबत अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं आहे.

Ajit Pawar taunt Jitendra Awhad On the habit of getting up early in the morning at Pune
Rupali Chakankar Update : रुपाली चाकणकर कोणाच्या बाजूनं? राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत झालं स्पष्ट

पवार म्हणाले, मी अनेक वर्षे विधीमंडळ सदस्य म्हणून काम केलं आहे. विरोधीपक्ष नेतेपदी कोणाची नियुक्ती करायची याचा अधिकार कुठल्याही पक्षाला नसतो. तर ही नियुक्ती विधानसभा अध्यक्षांकडून केली जाते. तसेच विरोधीपक्षांमध्ये ज्यांची संख्या जास्त त्या पक्षाचा नेता विरोधीपक्ष नेतेपदी नियुक्त केला जातो.

Ajit Pawar taunt Jitendra Awhad On the habit of getting up early in the morning at Pune
Rupali Chakankar Update : रुपाली चाकणकर कोणाच्या बाजूनं? राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत झालं स्पष्ट

"सुनील तटकरे यांनी अध्यक्ष झाले आणि काही निर्णय घेतले. विरोधी पक्ष नेता नेमण्याचं काम विधानसभा अध्यक्ष यांचं असत. जास्त सख्या असलेल्या पक्षाच्या नेत्याला विरोधी पक्ष नेता पद मिळतं. मात्र, आमदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बहुसंख्य आमदार आमच्या सोबत आहेत. महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही काम करत राहणार आहोत" असं यावेळी पवार म्हणाले. (Latest Marathi News)

Ajit Pawar taunt Jitendra Awhad On the habit of getting up early in the morning at Pune
NCP Action: प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यावरील कारवाईला वेग; सुळेंनी पवारांना लिहिलं पत्र

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश प्रगती करतोय त्यांच्या पाठीशी उभ राहून राज्याच्या हितासाठी काम करणार आहोत. केंद्रात राज्यात वेगळी सरकारे असतील तर निधी कमी मिळतो. आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या हिताचं काम करतो आहोत. त्यांना नोटीस काढण्याचा अधिकार नाही. पक्ष आणि चिन्ह आमच्यासोबत आहे. आमच्या सोबतच्या आमदारांचं भवितव्य यांना घटना कायद्याची कोणतीही अडचण येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, असंही अजित पवार यावेळी म्हणाले. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
Jayant Patil Jitendra Awhad Eknath Shinde meetting
Ajit Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com